पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी रात्री करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांना पांगरे परिसरात गांजाची मोठी खेप विक्रीसाठी आणली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून आवश्यक लेखी परवानगी घेतल्यानंतर पंच व पोलीस पथकासह नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला.
पांगरे येथील रमशानभूमीजवळ टेंभुर्णी-जेऊर मार्गावर संशयास्पदरीत्या उभी असलेली सिल्व्हर रंगाची पजेरो स्पोर्ट (एमएच-१२-केएफ-९८९९) पोलिसांच्या नजरेस पडली. वाहनाला घेराव घालून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव रोहित शिवाजी केचे (वय २४, रा. गारअकोले, ता. माढा, जि. सोलापूर) असे सांगितले.
त्यानंतर पंचांसमक्ष वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. वाहनामध्ये ठेवलेल्या पाच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये १० किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या गांजाची किंमत २ लाख ५२ हजार ५०० रुपये असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेली ८ लाख रुपये किमतीची पजेरो स्पोर्ट कार देखील जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश लालासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रोहित शिवाजी केचे याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ६४४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क) व २०(ब)(II)(ब) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा (भा.पो.से.), करमाळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तसेच दुष्यंत ढेंबरे, लोहार, अलिममलिक शेख, अर्जुन गोसावी, गणेश शिंदे, रमेश फुगे, चेतन पवार आणि ज्योतीराम बारकुंड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
अलीकडच्या काळात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सोलापूर जिल्हा पोलिसांनी कारवायांची तीव्रता वाढविली असून करमाळा पोलिसांची ही कारवाई त्याच मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग मानली जात आहे. युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या धडक कारवाईतून देण्यात आला आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…