Categories: Uncategorized

भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात संघटन बळकटीसाठी काम करणार – जितेश कटारिया

 

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी गणेश भाऊ चिवटे यांची विजय झाल्याबद्दल नंदन प्रतिष्ठानच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते..भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी गणेशभाऊ चिवटे यांची झालेली निवड ही पक्षवाढीसाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या नेतृत्वात करमाळा शहर व तालुक्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याची भूमिका भाजपचे सरचिटणीस जितेश कटारिया यांनी व्यक्त केली.यावेळी जितेश कटारिया म्हणाले, “गणेशभाऊ चिवटे यांच्यासारखा अभ्यासू, कार्यक्षम आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा नेता जिल्हाध्यक्ष झाल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील बूथस्तरापासून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल. नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे, नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवणे आणि पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत नेण्यासाठी सातत्याने काम केले जाईल.”यावेळी त्यांनी गणेशभाऊ चिवटे यांचे अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला आगामी काळात अधिक यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी सत्कार सोहळ्यात बोलताना गणेश भाऊ चिवटे यांनी देखील पक्ष संघटना वाढीसाठी लागेल ती मदत देण्याचे आश्वासन दिले. या सत्कार सोहळ्यासाठी भाजपाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि प्रतिष्ठानचे सर्व सहकारी उपस्थित होते

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

13 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

17 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

18 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago