Categories: Uncategorized

पंढरपूर अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक दिलीपकुमार मिरजकर सेवानिवृत्त

 

करमाळा प्रतिनिधी : पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, करमाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक दिलीपकुमार मिरजकर हे 31 जुलै 2026 रोजी प्रदीर्घ व यशस्वी सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.मनमिळाऊ स्वभाव, ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य यामुळे मिरजकर यांनी आपल्या सेवाकाळात वेगळी ओळख निर्माण केली. करमाळा येथे बँकेची नवीन शाखा सुरू झाल्यापासून त्यांनी शाखा व्यवस्थापक म्हणून अत्यंत जबाबदारीने कार्यभार सांभाळला. यापूर्वी त्यांनी पंढरपूर व कोरेगाव शाखांमध्येही उल्लेखनीय सेवा बजावत बँकेच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले.सुमारे तेहतीस वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी बँकेच्या नियमांचे काटेकोर पालन करत ग्राहकांना विश्वासार्ह, पारदर्शक आणि तत्पर सेवा दिली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ग्राहकांमध्ये बँकेविषयी विश्वास निर्माण झाला असून सहकारी व ग्राहकांशी त्यांनी जपलेले स्नेहबंध कायम स्मरणात राहतील.

सेवानिवृत्तीच्या निमित्ताने प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार राजेश गायकवाड यांनीही मिरजकर यांच्या कामाच्या पद्धतीचा व बँक क्षेत्रात असणारा अनुभव याची प्रशावशा करून त्यांच्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि आदर्श सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील जीवनप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बँकेचे कॅशियर सौरभ लंके, स्वप्नील कुलकर्णी, संदीप वीर, निलज गावचे प्रगतशील बागायतदार अविराज गायकवाड आदी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago