Categories: Uncategorized

मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोर्टी येथील श्री* *संत हरि हरि बाबा वारकरी शिक्षण संस्थेत उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम*

करमाळा प्रतिनिधी: माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत कोर्टी (ता. करमाळा) येथील श्री संत हरि हरि बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. करमाळा पंचायत समितीचे उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमात संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याला दोन वह्या, एक पेन आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. शिक्षणाबरोबरच संस्कार आणि सामाजिक जाणीव रुजविणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक करत ॲड. अजित विघ्ने यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते तसेच समाजातील दातृत्वाची भावना अधिक दृढ होते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कोर्टी पंचायत समिती गणाचे सदस्य नानासाहेब झाकणे, माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक निळकंठ अभंग, सुभाष अभंग, संस्थेचे कार्यवाह मच्छींद्र आप्पा अभंग, विजय महाराज अभंग, राजेंद्र महाराज अभंग, जावेद शेख यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निळकंठ अभंग यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी शुभेच्छा देत सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा जपण्यात आल्याने या उपक्रमाचे परिसरात स्वागत होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago