आजचा काळ बदलला आहे . जो सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाईल , अडी -अडचणी सोडवील त्याला नेता म्हणून जनता स्विकारते , वारस्याने जनमानसांत जाण्यापेक्षा संघर्षातून , कष्टातून व स्वकर्तृत्वातून स्वतःला सिद्ध करावं , बुजुर्ग मंडळीचं अवश्य मार्गदर्शन घ्यावं , वेळ कुणासाठी थांबत नाही , कष्टाच्या बळावर ध्येय गाठून मिळालेल्या संधीतून जनता जनार्दनाची सेवा करावी , सध्या युवंकाकडून राष्ट्र व समाज हिताच्या अपेक्षा आहेत .बुजुर्ग मंडळीनीही कर्तृत्ववान युवकांच्या पाठीशी राहून वडीलकीच्या नात्यानं मार्गदर्शन करावं असे प्रतिपादन जगताप कुटूंबाच्या वतीने आयोजीत दिग्वीजय बागल व गणेश चिवटे यांच्या घरगूती सत्कार समारंभात मा . आ . जयवंतराव जगताप यांनी मार्गदर्शन करताना केले . नुकतेच दिग्वीजय बागल यांची ‘ मुख्यमंत्री बळीराजा पाणंद /शेत रस्ता ‘ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीच्या राज्याच्या महसूल मंत्र्याच्या मार्गदर्शनाखालील समिती मध्ये करमाळा विधानसभा सह अध्यक्ष पदी निवड झाली आहे तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहीलेले विद्यमान जि. प . सदस्य गणेश चिवटे यांची पक्ष बळकटी साठी सोलापूर पश्चिम भाजपा जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाली आहे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दोन्ही सुपुत्रांचा वडीलकीच्या नात्यातून मा . आ . जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जगताप परीवाराच्या वतीने घरगूती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता .
माजी नगराध्यक्ष अमोदशेठ संचेती , जेष्ठ समाजसेवक श्रेणीकशेठ खाटेर , माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ , माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी , गटसचिव नेते बबन मेहेर , बाजार समिती संचालक जनार्दन नलवडे , बाजार समिती सचिव विठ्ठल क्षिरसागर , उद्योजक संतोषशेठ गुगळे , माजी नगरसेवक सुरेश इंदूरे , भाजपाचे जगदीश आगरवाल , सुहास घोलप , संजय घोरपडे , बाजार समिती संचालक मनोज पितळे , विक्रांत मंडलेचा , कॉन्ट्रॅक्टर भारत थिटे , अनिल सुरवसे , दत्तात्रय शिर्के , नितीन दळवे , लक्ष्मण थोरात , जोतीराम ढाणे , नगरसेवक युवराज चिवटे , नगरसेवक रोहीदास आलाट , नगरसेवक सचिन अब्दूले , विजय सरडे , प्राचार्य डॉ . तानाजी जाधव , मुख्याध्यापक अनिस बागवान, मुख्याध्यापक युसूफ शेख , बाजार समिती सहसचिव रवींद्र उकीरडे ,शेखर जोगळेकर , मंगेश तरकसे , महेश ढाणे , दिगंबर रासकर , खरेदी विक्री संघ संचालक हनुमंत ढेरे , शहाजी शिंगटे,बाजार समितीचे नूतन संचालक हनुमंत चांदणे ,मयूर दोशी , उत्कर्ष गांधी , श्री . सुनील मेहता , अमृतशेठ कटारिया , अस्लम शेख, सादीक आतार , रविंद्र सपकाळ , चेतन आलाट आदीं उपस्थित होते . यावेळी प्रा . दत्तात्रय भागडे यांनी प्रास्तविक करून स्वागत केले . यावेळी माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ , श्रेणीक शेठ खाटेर , संजय घोरपडे , बबन मेहेर यांनी मनोगते व्यक्त केली . सत्कार मूर्ती दिग्विजय बागल व गणेश चिवटे यांनी मनोगते व्यक्त करून केलेल्या यथोचित सन्मानाबद्दल ऋण व्यक्त केले . मा . आ . जयवंतराव जगताप यांनी आपल्या मनोगतातून स्वतः च्या राजकीय अनुभवातील काही किस्से सांगून मार्मिक शब्दा मधून आपल्या खास शैलीत मौलीक मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉ . तानाजी जाधव यांनी मानले .
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…