Categories: Uncategorized

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

 

करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमारजी गोरे साहेब यांच्याविषयी करण्यात आलेल्या बेताल व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जोडे मारून संताप व्यक्त केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले की लोकशाहीमध्ये मतभेद असणे स्वाभाविक असले तरी टीका करताना सभ्यता, संस्कार आणि राजकीय मर्यादांचे भान राखणे आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवर जाऊन अवमानकारक भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला न शोभणारी बाब आहे,
पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांनी ग्रामीण विकास, जनकल्याण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे अशा विकासाभिमुख नेतृत्वावर खालच्या पातळीवर जाऊन करण्यात येणारी टीका भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत. भविष्यातही अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये केल्यास त्याला लोकशाही मार्गाने तीव्र उत्तर दिले जाईल, असा इशाराही गणेश चिवटे यांनी दिला.
यावेळी भाजपा करमाळा शहर मंडल अध्यक्ष काकासाहेब सरडे, नगरसेवक रामभाऊ ढाणे, विजय घोलप, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब देवकर, बंडू शिंदे, सोमनाथ घाडगे, हर्षद गाडे, नवनाथ नाळे, नानासाहेब अनारसे, समाधान कांबळे, संजय ढेरे, जयंत काळे पाटील, गणेश महाडिक, रणजीत पवार, राजेश पाटील, गोकुळ मुरुमकर, हनुमंत रणदिवे, दिपक गायकवाड, सागर सरडे, विश्वनाथ ढेरे, अशोक मोरे, संजय दुर्गुळे, संजय किरवे, तात्यासाहेब शिंदे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago