Categories: Uncategorized

शाहुनगर पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नवीन चार इंची पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उत्साहात नगरपरिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

*
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत नगरपरिषदेच्या माध्यमातून नवीन चार इंची पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या विकासकामाचा शुभारंभ करमाळा नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई सावंत व त्यांचे पती नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांच्या हस्ते करण्यात आला, तर कार्यक्रमाचे विधिवत पूजन प्रभागाच्या नगरसेविका सौ. स्वातीताई फंड व त्यांचे पती महादेव आण्णा फंड यांच्या हस्ते करण्यात आले.
शाहूनगर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली असून नवीन वसाहती विकसित झाल्या आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी वाढत असताना विद्यमान पाईपलाईनवर ताण येत होता. परिणामी अनेक भागात कमी दाबाने पाणी मिळणे, पाणीपुरवठा अनियमित होणे अशा समस्या नागरिकांना भेडसावत होत्या. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने नागरिकांची मागणी लक्षात घेऊन नवीन चार इंची पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला. या कामामुळे शाहूनगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार असून भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येची गरजही पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
भूमिपूजन समारंभास करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत, नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत, उपनगराध्यक्ष अतुल भैय्या फंड, नगरसेविका सौ. स्वातीताई फंड, नगरसेविका चैताली सावंत, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना लुणिया, नगरसेविका सुवर्णा आल्हाट, नगरसेविका सुनिता ढाणे, नगरसेवक दीपक चव्हाण, नगरसेवक रवी जाधव, नगरसेवक प्रतिनिधी सचिन गायकवाड, नगरसेवक सचिन घोलप, नगरसेवक सुनील बनसोडे, नगरसेवक प्रतिनिधी अमोल परदेशी, नगरसेविका प्रतिनिधी विजय घोलप, हुमरान मुलाणी, पिल्लू इंदलकर, या कामाचे कंत्राटदार किशोर कुलकर्णी यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, सर्व नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाहूनगरच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. पाणीपुरवठ्यासह रस्ते, गटारी, स्वच्छता, सार्वजनिक प्रकाश व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी नगरपरिषद कटिबद्ध असून नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. विकासकामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नसून शहराच्या प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
उपनगराध्यक्ष अतुल भैय्या फंड नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांनी शाहूनगर परिसरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यातून या नवीन पाईपलाईनच्या कामास मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. महादेव आण्णा फंड यांनीही या विकासकामासाठी सहकार्य करणाऱ्या नगरपरिषदेचे व सर्व लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले.
नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या गरजेनुसार विकासकामे सुरू असून शाहूनगरमधील ही नवीन पाईपलाईन भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले. नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांनीही नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली.
नवीन चार इंची पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर शाहूनगर परिसरातील शेकडो कुटुंबांना अधिक दाबाने, नियमित व अखंड पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. पाण्याचा दाब वाढण्याबरोबरच पुरवठ्यातील अडचणी कमी होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी विकासकामाचे स्वागत करत नगरपरिषदेचे, नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत, नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत, उपनगराध्यक्ष अतुल भैय्या फंड नगरसेविका सौ. स्वातीताई फंड तसेच सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
शाहूनगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असून या कामामुळे परिसराच्या नागरी सुविधांमध्ये मोठी भर पडणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

23 hours ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago