करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज व परिवार संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास गुरुवारी अत्यंत भक्तिमय, आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. समाजातील पदाधिकारी, विश्वस्त, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शिंपी समाजातील बंधू-भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत हरिनाम सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
यावर्षी श्रीसंत नामदेव शिंपी महाराज व परिवार संजीवन समाधी सोहळा मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
महाप्रसादाचे आयोजन कै. अजिनाथ रंगनाथ गाठे यांच्या स्मरणार्थ श्री. प्रशांत गाठे, श्री. प्रवीण गाठे व गाठे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच सन २०२७ च्या संजीवन समाधी सोहळ्यातील महाप्रसाद अन्नदानाचे यजमान म्हणून श्री. श्रीराम बुलबुले (गुरुजी) यांची घोषणा यावेळी करण्यात आली.
सोहळ्यानिमित्त शिंपी समाजातील कष्टाळू व होतकरू महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून हा सन्मान सौ. पुष्पा वादवणे व श्री. कैलास वादवणे (करमाळा) यांच्या वतीने करण्यात येणार आहे. समाजातील महिलांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याच दिवशी काल्याचे कीर्तन, श्रीसंत नामदेव महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी तसेच करमाळा शहरातील प्रमुख मार्गांवरून एकाच पोशाखातील महिलांची भव्य टाळकरी दिंडी काढण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या पवित्र धार्मिक सोहळ्यास करमाळा शहरासह परिसरातील सर्व भाविकांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहावे व सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री पांडुरंग वडे, सचिव, श्री शिंपी समाज पंच वाडा, करमाळा यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…