सालाबादप्रमाणे यंदाही नागपंचमीच्या दिवशी संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाजाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नाभिक समाज बांधवांची विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली असून, समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष नारायण पवार यांनी केले आहे.
यंदा नागपंचमी सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी सकाळी ८ वाजता नगरपरिषदेसमोरील रामचंद्र दळवी यांच्या निवासस्थानापासून नागोबांच्या रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक रावगाव रोडवरील नागोबा मंदिरापर्यंत जाणार आहे. पारंपरिक पद्धतीने धार्मिक वातावरणात ही मिरवणूक काढण्यात येणार असून, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपंचमीच्या धार्मिक कार्यक्रमात समाज बांधवांचा सहभाग वाढावा, यासाठी सर्व नाभिक समाज बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून मिरवणुकीत सहभागी व्हावे, असेही तालुकाध्यक्ष नारायण पवार यांनी सांगितले. समाजाची एकजूट आणि धार्मिक परंपरा जपण्यासाठी प्रत्येकाने या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त सकाळी ११ वाजता गणेशनगर येथील संतसेना महाराज मंदिरात विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे नियोजन, धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा तसेच समाजाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
नाभिक समाजाच्या धार्मिक व सामाजिक परंपरांना बळकटी देण्यासाठी तसेच समाजातील एकोपा कायम ठेवण्यासाठी या बैठकीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नाभिक समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला, पदाधिकारी आणि सर्व समाज बांधवांनी वेळेत उपस्थित राहून बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष नारायण पवार यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा देवीचा माळ येथील कमला भवानी देवी मंदिरासमोरील भव्य गार्डन उभा करणे…
सोलापूर, शहर प्रतिनिधी. ‘सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक’ हे ब्रीद घेऊन मराठी साहित्यविश्वात कार्यरत…
करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६…
करमाळा प्रतिनिधी दुष्काळाच्या झळा केवळ माणसांनाच सोसाव्या लागत नाहीत, तर जंगलातील मुके वन्यजीवही पाण्याच्या थेंबासाठी…