Categories: Uncategorized

गतिरोधक बनवून मिळावा या मागणीसाठी उमरड येथे 15 ऑगस्ट दिवशी रस्ता रोको करणार – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांच्याकडे दोन महिन्यापासून पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देऊन ही गतिरोधक बनवून मिळाला नाही कुंभेज फाटा ते रामवाडी रोडवरती
त्यामुळे अखेर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वा खाली सर्व ग्रामस्थां च्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे
उमरड येथे कोठावळे शॉपिंग सेंटर जवळ धोकादायक कॉर्नर आहे याच ठिकाणी एका बाजूला रस्ता पूर्व सोगाव दिशेला जातो व दुसऱ्या बाजूला उमरड गावात बाजार तळात जातो जवळच प्राथमिक जिल्हा परिषद शाळा आहे या ठिकाणी गतिरोधक बनवून मिळावा.
तसेच चौधरी वलटे वस्ती या ठिकाणी रस्ता बोगद्यातून जातो व मोठा कॉर्नर आहे जवळच जिल्हा परिषद शाळा आहे या बोगद्यातूनच पोंधवडीच्या दिशेला एक रस्ता जातो त्यामुळे वलटे वस्ती जवळ गतिरोधक बनवून मिळवा.
आत्तापर्यंत या दोन्ही ठिकाणी अपघात होऊन पाच लोकांचा मृत्यू झाला आहे व दोन लोकांचे पाय मोडले आहेत आज रोजी दोघेजण दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत तसेच विजय सोनवणे यांच्या घरावरती सिमेंट खडी घेऊन जाणारा दहा चाकी टिपर पलटी झाला आहे या सर्व अपघाताच्या प्रकारामुळे उमरड गावातील नागरिक संतप्त झाले असल्यामुळे 15 ऑगस्ट 2026 दिवशी रस्ता रोको करणार आहेत सदर निवेदनाच्या प्रती राजाभाऊ कदम यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज, उपविभाग करमाळा यांना दिले आहेत

saptahikpawanputra

Recent Posts

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर! पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आवर्तन एक महिना अगोदर सुरू करण्याची मागणी

  करमाळा प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा…

2 days ago

करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे सचिन (मालक) गायकवाड यांच्या हस्ते दिमाखात उद्घघाटन

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…

5 days ago

ऊसदर आणि अतिवृष्टी अनुदानासाठी १३ नोव्हेंबर रोजी करमाळ्यात शेतकऱ्यांची बैठक; आंदोलनाची दिशा ठरणार – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६…

6 days ago

दुष्काळात मुक्या जीवांसाठी कै बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानचा माणुसकीचा झरा सात वर्षांपासून वन्यजीवांसाठी चारा-पाण्याची अखंड सेवा

करमाळा प्रतिनिधी दुष्काळाच्या झळा केवळ माणसांनाच सोसाव्या लागत नाहीत, तर जंगलातील मुके वन्यजीवही पाण्याच्या थेंबासाठी…

6 days ago