जेऊर प्रतिनिधी नुकताच अर्जुन पुरस्कार मिळालेले ,सुयश जाधव यांचा सत्कार जेऊर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय जेऊर येथे मा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना सुयश जाधव म्हणाले, मी दिव्यांग असताना मला जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारे व पूर्णतः सहकार्य करणारे माझे वडील आहेत.त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू होण्यामागे मला प्रेरीत करणारे माझे वडील आहेत. व मी माझ्या वडीलांमुळे घडलो.”
यावेळी करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे अतुल भाऊ पाटीलआदींनी मनोगत व्यक्त केले.
“घराघरात एक मुलगा देशाचं नाव उंचावर नेणारा असवा.आपल्या मुलांवर चांगले संस्कार द्या. सुयश जाधव यांना यश लाभो ,अश्या शुभेच्या मा आमदार नारायण आबा पाटील यांनी दिल्या. यावेळी या कार्यक्रमासाठी , गहिनीनाथ ननवरे करमाळा सभापती, ,उपसभापती दत्तात्रय सरडे, मा सभापती शेखर तात्या गाडे,अतुल भाऊ पाटील,पं .स सदस्य , सुनील तळेकर मा सदस्य , तसेच जेऊर चे सरपंच उपसरपंच ,व सदस्य उपस्थित होते सत्कार मूर्ती सुयश जाधव ,नारायण जाधव , आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद गरड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष वाघमोडे,धनंजय शिरस्कर आदींनी परीश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…