स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शाळा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाळेच्या परिसरातील कचरा, पालापाचोळा तसेच अनावश्यक वस्तू हटवून परिसराची स्वच्छता केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेऊन परिसर स्वच्छ ठेवावा, असा संदेश देण्यात आला.
यावेळी बोलताना अल्लाउद्दीन शेख यांनी स्वच्छता ही केवळ एखाद्या दिवसापुरती मर्यादित न राहता प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग झाली पाहिजे, असे सांगितले. स्वच्छ वातावरणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. शाळा, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच आपल्या परिसराची स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सामाजिक संस्थांनीही अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक सुनील जाधव सर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच आकुंश खाने सर, जगदाळे सर, विजय धनवे सर, जितेश कांबळे सर, शुभम पाटील सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनचे उपाध्यक्ष वाजीद शेख, सचिव मजहर नालबंद, मतीन शेख, आलीम शेख, सादिक यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख, उपाध्यक्ष मतीन शेख, खजिनदार आलीम शेख, सद्दम मुलानी यांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर झाला. सामाजिक एकोपा, स्वच्छता आणि नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. स्वच्छ शाळा, स्वच्छ परिसर आणि निरोगी समाजासाठी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…
करमाळा प्रतिनिधी सोगांव ग्रामपंचायत च्या उप- सरपंच पदी करमाळा विधानसभा मा.आमदार श्री संजय (मामा) शिंदे…