भारतीय स्वातंत्र्याच्या 80 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, आणि युवासेना (शिंदे गट) करमाळा तालुक्याच्या वतीने आज १५ ऑगस्ट रोजी करमाळा येथे एक भव्य आणि अभूतपूर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवासेना ज़िल्हासमन्वयक निखिल चांदगुडे आणि युवासेना करमाळा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला तालुक्यातील शिवसैनिक आणि युवकांनी हजेरी लावली, ज्यामुळे करमाळयात युवासेनेचे मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत पवित्र आणि उदात्त उपक्रमाने झाली. ‘रक्तदान हीच खरी सेवा, जनसामान्यांची सेवा यालाच मानूया ईश्वर सेवा’ हा विचार घेऊन आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य रक्तदान शिबिरात’ तालुक्यातील अनेक युवक, तरुणी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.
स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून युवासेनेने आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. कार्यक्रमात ‘युवासेना BLA नोंदणी आढावा बैठक’ पार पडली. यामध्ये प्रत्येक बूथ स्तरावर सक्षम कार्यकर्ता नेमण्यासाठी आणि मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासाठी निखिल चांदगुडे यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘भव्य पक्षप्रवेश मेळावा’. करमाळा तालुक्यातील विविध गावांमधील अनेक प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी शिवसेना-युवासेनेच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती युवासेना माढा लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख सुजितजी खुर्द, महेश दादा चिवटे, देवानंद बागल व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भगवा शाल घालून स्वागत केले.सचिनजी हागारे यांचा युवासेनेत प्रवेश हा नक्कीच युवासेनेला बळ देईल व सचिनजी ना मोठी जबाबदारी देऊ अशी ग्वाही सुजित खुर्द यांनी दिलीआपल्या भाषणात महेश दादा चिवटे यांनी माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कार्यपद्धतीचे आणि त्यांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांचे कौतुक केले. “एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा सर्वांगीण विकास होत आहे. खा. श्रीकांत शिंदे साहेब हे युवकांसाठी आणि आरोग्याच्या क्षेत्रात अभूतपूर्व काम करत आहेत. त्यांचे कार्य आणि त्यांचा कामाचा झपाटा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळातील आव्हाने आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देताना सुजितजी खुर्द म्हणाले, “आगामी काळ हा शिवसेना आणि युवासेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला प्रत्येकाला केवळ कार्यकर्ता म्हणून नाही, तर ‘राष्ट्रसेवक’ आणि ‘समाजसेवक’ म्हणून काम करायचे आहे. येणाऱ्या काळात आपली कार्यपद्धती ही पूर्णपणे पारदर्शक आणि जनताभिमुख असली पाहिजे. आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचून शासनाच्या योजना आणि शिवसेनेचे विचार पोहोचवले पाहिजेत.त्यांनी BLA च्या नियुक्तीचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की, “बुथ जिंकला तरच निवडणूक जिंकली जाते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या बूथवर लक्ष केंद्रित करून मतदार यादीतील प्रत्येक मतदाराशी संपर्क साधणे आवश्यक आहे.” माढा लोकसभा मतदार संघामध्ये निखिल चांदगुडे यांच काम उल्लेखनीय आहे असेही त्यांनी याठिकाणी आपले मत व्यक्त केले. विशाल गायकवाड हे BLA नोंदणीची जबाबदारी अचूकपने पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले.निखिल चांदगुडे यांनी उपस्थित युवकांना आवाहन केले की, “आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपल्या देशाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवकांनी राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय होणे गरजेचे आहे. आपण एकत्र येऊन एक सक्षम आणि समर्थ करमाळा तालुका निर्माण करूया.”
तसेच त्यांनी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या कुशल संघटनात्मक कौशल्याचाही उल्लेख करून त्यांचे मार्गदर्शन नेहमीच लाभत असल्याचे सांगितले. शिवसेना माढा लोकसभा मतदार संघ संपर्कप्रमुख चंद्रहार दादा पाटील यांचा नेतृवाखाली काम करताना नेहमी ऊर्जा मिळते व त्यांनी राज्यातील केलेल्या कामांचा उजाळा दिला.या कार्यक्रमाला शिवसेना युवासेना करमाळा तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी गौतम रोडे,पद्मजा ताई इंगवले, सुयश कर्चे,श्रीकांत गोसावी,माळशिरस विधानसभा संपर्कप्रमुख विजय कोकणे,कुर्डुवाडीचे सागर कोले,विनोद सोनवणे,संतोष लाड, मा सरपंच योगेश सोरटे, नाना भोगल, पप्पू ढवळे, जिल्ह्यातील शिवसैनिक आणि युवा उपस्थित होते.
सोलापूर, शहर प्रतिनिधी. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी गोरख खंडागळे…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराचे ग्रामदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमलादेवी मंदिराच्या जतन व…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील मुस्लिम समाजातील युवा नेते तसेच मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनचे…
करमाळा प्रतिनिधी ॲग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने टेंभुर्णी येथे महाराष्ट्रातील केळी बागायतदार शेतकऱ्यांचा मेळावा…
करमाळा, प्रतिनिधी : कष्टकरी, हमाल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कामगार नेते स्व.…