Categories: Uncategorized

2026 चा मिंगल केळी रत्न पुरस्कार डॉ. विजय बागल यांना प्रदान.

करमाळा प्रतिनिधी
ॲग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने टेंभुर्णी येथे महाराष्ट्रातील केळी बागायतदार शेतकऱ्यांचा मेळावा केळी तंत्र पुष्प 2026 हा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील केळी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते मिंगल केळीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गुळसडी येथील डॉक्टर विजय बागल यांनी केळी पिकाच्या उत्पादनवाढ, गुणवत्तावाढ व निर्यातक्षम दर्जा प्राप्त करण्यासाठी केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब तसेच केळी पिकाच्या एस ओ पी चे यशस्वी पालन करून आपल्या परिसरात एक आदर्श व प्रगतिशील केळी बागायतदार म्हणून उल्लेखनीय स्थान निर्माण केल्याबद्दल मिंगल केळी रत्न हा सन्मान प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय केळी संशोधन संस्था त्रिची तामिळनाडू येथील केळी संशोधक शास्त्रज्ञ डॉ.व्ही कुमार ,डॉ.बर्लिनर, एक्सपोर्ट तज्ञ डॉ.अजहर पठाण, ॲग्री सर्च इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रदीप कोठावदे, केळी तज्ञ शरद विसपुते, मनोज शहा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. विजय बागल यांनी या पुरस्कारानंतर आपल्या परिसरामध्ये युरोपसाठी निर्यातक्षम केळी चा दर्जा निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण स्वतः प्रयत्न करणार असून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनाही याविषयी जागृत करण्यात करणार असल्याचे सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

3 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

16 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

19 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

24 hours ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago