करमाळा प्रतिनिधी . करमाळा शहर व तालुक्यात 7 संप्टेबर रोजी ३४५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात तब्बल ४७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करमाळा तालुक्यात यात ३१ पुरुष तर १६ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बाधीत रुग्णांच्या घरातील व्यक्ती तपासणीमध्ये निगेटिव्ह आली असेल तरीही त्या व्यक्तीने इतरांशी संपर्क टाळावा तसेच जे व्यक्ती तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.आज करमाळा शहरात घेण्यात आलेल्या २८१ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये १७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे यामध्ये महेंद्रनगर 1 पुरुष,किल्लावेस 2 पुरुष,1महिला,कानाडगल्ली 2 महिला, संभाजी नगर 2 महिला, फंडगल्ली1 महिला, गणेशनगर 1पुरुष ,गुजरगल्ली 1 महिला,शाहुनगर 1 महिला राशीनपेठ 1 महिला, सिध्दार्थनगर 1 महिला कृष्णाजीनगर 1 महिला, सुतारगल्ली 1 पुरुष,एसटी काॅलनी 1पुरुष तर ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या ६४ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये गुळसडी 1 पुरुष,देवीचामाळ 1 महिला, जेऊर 3 महिला1, वीट 1 पुरुष,पोथरे 1पुरुष,सरपडोह 1 पुरुष,वाशिंबे 1पुरुष,वंजारवाडी 2 पुरुष 1 महिला केम 1पुरुष,खांबेवाडी 1पुरुष,झरे 1पुरुष,जिंती 9 पुरूष 2 महिला,चापडगाव 1 पुरुष,माढा 2 पुरुष यांचा समावेश आहे. आज ३४ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ५८६ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या ३४० जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९४७ वर जावून पोहोचली आहे. करमाळा शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करून मास्क न वापरता फिरताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नागरिकांनी आता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
करमाळा प्रतिनिधी स्त्री ही जगाची जननी असून, ती श्रीदेवीच्या रूपाने संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करणारी माता…
करमाळा : प्रतिनिधी केत्तुर रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करमाळा…
करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…
करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…
करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…