Categories: Uncategorized

कमलादेवी मंदिर जीर्णोद्धारासाठी सौरभ देशपांडे यांची ५ हजार १ रुपयांची देणगी

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराचे ग्रामदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी करमाळा येथील रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले श्री. सौरभ सुनील देशपांडे यांनी १६ ऑगस्ट २०२६ रोजी ५ हजार १ रुपयांची ऑनलाइन देणगी श्री कमलादेवी चरणी अर्पण केली. मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या सुरू असलेल्या कार्याला हातभार लावण्यासाठी त्यांनी ही देणगी दिली.
या देणगीबद्दल श्री कमला देवी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक अशोक गाठे यांनी सौरभ देशपांडे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. यावेळी मंदिराचे मानकरी, सेवेकरी तसेच भाविक भक्त उपस्थित होते.
श्री कमलादेवी मंदिराला प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभला असून मंदिराच्या मूळ पुरातन दगडी वास्तूचे जतन व संवर्धन करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट, करमाळा यांच्या पुढाकारातून गेल्या वर्षापासून मंदिर जतन व संवर्धनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. भाविकांच्या देणगीरूपी सहकार्यातून या महत्त्वपूर्ण कार्याला मोठी चालना मिळत आहे.
मंदिराच्या जतन व संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर भाविकांना श्री कमलादेवी मंदिराच्या मूळ पुरातन दगडी स्वरूपाचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने घेता येणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक व धार्मिक वास्तूचे संवर्धन होऊन पुढील पिढ्यांसाठी हा वारसा जतन होणार आहे.
या पवित्र कार्यासाठी भाविक, नागरिक, माजी विद्यार्थी, उद्योजक तसेच श्री कमलादेवी भक्तांनी सढळ हाताने देणगी देऊन मंदिर जतन व संवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी ऑनलाइन देणगीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देणगीसाठी संपर्क :
अशोक गाठे, व्यवस्थापक
मो. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

18 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

20 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago