करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील भविष्यातील वीज समस्या लक्षात घेऊन शिंदे यांनी 2023 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गौंडरे येथे 132 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारण्याची मागणी केली होती. जागेची उपलब्धता व तांत्रिक अडचणींमुळे मूळ प्रस्तावात अडथळे निर्माण झाल्यानंतर त्यांनी सौंदे येथे 132 केव्ही तसेच 33/11 केव्ही उपकेंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. 2024 अखेर या कामासाठी आवश्यक मंजुरी व निधीची तरतूद झाली.
मात्र, जेऊर-वरकटणे-शेलगाव (क.)-अर्जुननगर-मिरगव्हाण या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 10 च्या दोन्ही बाजूची गायरान जमीन प्रकल्पासाठी आवश्यक असल्याने आणि प्रकल्पाच्या जागेतून रस्ता जात असल्याने तो वळविणे आवश्यक होते. यासाठी शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापारेषण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
या पाठपुराव्याला आता यश आले असून सौंदे येथील गट क्र. 2 व 32/1 मध्ये ADBI (Asian Development Bank Investment) अंतर्गत 33/11 केव्ही उपकेंद्राला मंजुरी मिळाली असून काम सुरू होणार आहे. तसेच 132 केव्ही उपकेंद्रासाठी रस्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पालाही प्रारंभ होणार आहे.उजनी धरणातून मराठवाड्याकडे जाणारा बोगदा, बोगद्यावरील 9 शाफ्ट तसेच बोगद्याच्या परिसरात शेतकऱ्यांनी घेतलेल्या विविध कूपनलिकांमुळे भविष्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याचबरोबर पूर्व भागातील सुमारे 20 गावांना दहीगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळत असल्याने कृषी पंपांचा वीजभारही वाढणार आहे. या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पुढील 50 वर्षांचा विचार करून उभारण्यात येणारे सौंदे उपकेंद्र तालुक्याच्या वीज व्यवस्थेसाठी दूरदृष्टीचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.या वीज प्रकल्पासाठी केलेल्या भरीव प्रयत्नांबद्दल सौंदे ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच उमेश वीर, भरतभाऊ आवताडे, रविंद्र गायकवाड, दत्तात्रय जगताप, विजय आवटे, ललित कदम, अशोक कदम, पवन आवटे, विजय जगताप, अशोक साळुंखे, कैलास आवटे, सचिन डुकळे, पोपट डुकळे, निळसर ओम जगताप, महेश उगले, अण्णा मोरे, पिंटू कदम, कुंदन आवटे आदी उपस्थित होते. तसेच या कामासाठी सुनील पवार (ज्युनिअर इंजिनिअर), भोईर साहेब (उपअभियंता) आणि दशरथ देवकर (वायरमन) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
चौकट : शिंदेंकडून डॉ. लोंढे व उमेश वीर यांचे कौतुक
सत्काराला उत्तर देताना माजी आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, “लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य मी पार पाडले; मात्र या कामासाठी स्थानिक पातळीवर उपसरपंच उमेश वीर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. जवळपास दोन वर्षे त्यांनी स्वखर्चाने करमाळा, जेऊर, सोलापूर अशा ठिकाणी फेऱ्या मारल्या. त्यांच्या प्रयत्नांना साडे गावचे सुपुत्र आणि महावितरणच्या मुख्यालयात अतिरिक्त कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत डॉ. रामचंद्र लोंढे यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच हे काम शक्य झाले,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
करमाळा प्रतिनिधी : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत ग्लोबल फाऊंडेशन संचलित पवार जनरल हॉस्पिटल, बस स्टँडजवळ,…
सोलापूर, शहर प्रतिनिधी. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी गोरख खंडागळे…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराचे ग्रामदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमलादेवी मंदिराच्या जतन व…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील मुस्लिम समाजातील युवा नेते तसेच मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनचे…
करमाळा प्रतिनिधी ॲग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने टेंभुर्णी येथे महाराष्ट्रातील केळी बागायतदार शेतकऱ्यांचा मेळावा…