Categories: Uncategorized

करमाळ्याच्या मुथा नॉलेज फाउंडेशनची आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दमदार कामगिरी; 57 पैकी 48 विद्यार्थ्यांचा गौरव

 

करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या क्रमांकासह शायनिंग स्टार, रनरअप व बेस्ट परफॉर्मन्स पुरस्कारांची लयलूट
करमाळा : सतत पंधरा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यशाची परंपरा कायम ठेवणाऱ्या करमाळा येथील मुथा नॉलेज फाउंडेशनच्या 57 विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय ऑनलाइन अबॅकस स्पर्धेत सहभाग घेत दमदार कामगिरी केली. अरिस्टॉकेट्स अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध जिल्हे, राज्ये तसेच विविध देशांतील सुमारे 3200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांना अवघ्या सात मिनिटांत 100 गणिते सोडविणे बंधनकारक होते. या आव्हानात्मक परीक्षेसाठी मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी तब्बल दोन महिन्यांपासून नियमित सराव केला. विद्यार्थ्यांना मोबाईलवर सराव करता यावा यासाठी मॉक टेस्टची सुविधा वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली होती. सातत्यपूर्ण सरावामुळे विद्यार्थ्यांच्या वेगात व अचूकतेत मोठी सुधारणा झाली आणि अनेक विद्यार्थी अवघ्या पाच ते सहा मिनिटांत 100 गणिते अचूकपणे सोडवू लागले.
विद्यार्थ्यांना परीक्षेची योग्य तयारी करून घेण्यासाठी संस्थेच्या वतीने अतिरिक्त सराव, मार्गदर्शन तसेच मोटिवेशनल लेक्चर्सचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी नियमित वेळेपेक्षा अधिक वेळ देत सातत्याने सराव केला. त्याचा परिणाम या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निकालात दिसून आला.
या स्पर्धेचा निकाल 16 ऑगस्ट रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थी व पालकांनी यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या विजयश्री सभागृहात एकत्रितपणे ऑनलाइन निकाल ऐकला. यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी व पालकांनी जल्लोष करत विजेत्यांचे अभिनंदन केले.
या स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशनच्या एकूण 48 विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम ते सहाव्या क्रमांकासह शायनिंग स्टार, रनरअप आणि बेस्ट परफॉर्मन्स पुरस्कारांचा समावेश आहे.
प्रमुख क्रमांक प्राप्त विद्यार्थी
प्रथम क्रमांक :
श्रावणी गवळी, यश गणेश शिरसागर,शौर्य शिंदे, शिवतेज कदम, शर्वरी शिंदे, स्वयम् पानसांडे, समृद्धी गायकवाड.
द्वितीय क्रमांक :
आहिल बागवान, सार्थक वनारसे, कृष्णा माळी, आयुश्री फंड, समृद्धी वाघमारे, शिवराज ढवळे.
तृतीय क्रमांक :
साई काळे, वेदांत रोडे, आरोही घुमरे, शिवेंद्र गरड, स्वराली हिरडे.
चतुर्थ क्रमांक :
स्वानंद मोरे,आयुश्री फंड, रुद्रप्रतापसिंह पवार, अनन्या फंड, ओवी मुरकुटे, स्वयम् पानसांडे.
पंचम क्रमांक :
धैर्यशील बिले, अन्वित यादव, देवांशी शिंदे.
सहावा क्रमांक :
शिवराज ढवळे.
शायनिंग स्टार पुरस्कार
शिवांजय सावंत, अनिशा पेटकर, शर्विल माने, वेदिका पलंगे, जैनब बागवान, धैर्य शिंदे, शिवेंद्र गरड, प्रज्वल कांबळे, मयंक गवळी, राजवीर लावंड, आरोही थोरात, स्वरा सूर्यवंशी, शिवम सूर्यवंशी, श्रेयस शिंदे, शिवराज ढवळे.
रनरअप पुरस्कार
सिद्दीक बागवान, शिवम ढवळे, शौर्य बुलबुले, शर्वरी शिंदे, समर्थ सूर्यवंशी, सई पडवळे, नेत्राली शिरसकर.
रनरअप व बेस्ट परफॉर्मन्स पुरस्कार
अर्जुन वीर, साद बागवान, सानवी गंगे, वीर प्रताप चौधरी, शौर्य शिंदे, अगस्त सुतार, भैरवी लटके, विनायक शिंदे, मानसी गाडेकर.
या स्पर्धेत अगदी लहान वयातील विद्यार्थ्यांपासून ते आठवी-नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अबॅकसच्या नियमित सरावामुळे विद्यार्थ्यांच्या गणितीय क्षमतेसोबतच एकाग्रता, वेग, अचूकता, आत्मविश्वास आणि वेळेचे नियोजन करण्याची क्षमता विकसित होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुथा नॉलेज फाउंडेशनच्या आजपर्यंतच्या वाटचालीतून अनेक विद्यार्थी घडले असून, या अकॅडमीमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनिअर तसेच देश-विदेशातील विविध जबाबदारीच्या पदांवर कार्यरत आहेत. सामान्य विद्यार्थ्यांपासून गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सरावातून गरुडझेप घेण्याची संधी देण्याचे काम संस्था करत आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना मुथा नॉलेज फाउंडेशनच्या संस्थापिका ज्योती मुथा, तसेच स्मिता वनारसे मॅडम व राणी सावंत मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात पालक गणेश क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थी साई सागर काळे यांनीही आपले अनुभव मांडले. संस्थापिका ज्योती मुथा यांनी अबॅकसचे महत्त्व, स्पर्धात्मक परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये होणारे सकारात्मक बदल आणि सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
पालकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुथा नॉलेज फाउंडेशनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago