Categories: Uncategorized

करमाळा पोलिसांचा धडाका; १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि मोटारसायकल चोरीचा छडा; दोन आरोपी अटकेत

करमाळा  प्रतिनिधी
करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी महिला आरोपी साधना जैन्ना काळे (वय २७, रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) हिला अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेला सोन्याचा ऐवज जप्त केला. याचबरोबर करमाळा शहरातून चोरीस गेलेल्या ६५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकल चोरीचाही तपास करून रावसाहेब ऊर्फ पप्पू पांडुरंग चव्हाण (रा. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली. दोन्ही कारवायांत पोलिसांनी एकूण सुमारे १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दि. ३० जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास धनंजय पुजारी (वय ३२, रा. अंकोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हे करमाळा येथून सोलापूरकडे बसने प्रवास करीत होते. बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी आपली पर्स तपासली असता पर्सच्या सर्व चेन उघडलेल्या असल्याचे आढळून आले. तपासणी केली असता पर्समधील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. यामध्ये २५ ग्रॅम सोन्याचा राणी हार, २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे घडण, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा चौकर आणि ५ ग्रॅम वजनाचे कानातील झुबे-टॉप, असा एकूण सुमारे १० लाख ५ हजार रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन करमाळा पोलिसांनी तपासाला वेग दिला. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कवाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा डी.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला सूचना दिल्या. पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला. त्यातून साधना जैन्ना काळे हिचे नाव निष्पन्न झाले. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचा ऐवज घरातील पेटीमध्ये ठेवल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सोन्याचे दागिने जप्त करून तिला अटक केली.
दरम्यान, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे एकच्या सुमारास ओंकार सुभाष मारटकर यांच्या कसबा गल्ली येथील घराबाहेर लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल चोरीस गेली होती. या मोटारसायकलची किंमत सुमारे ६५ हजार रुपये असून तिचा क्रमांक MH 16 Z 9940 व चेसीस क्रमांक 06G16F21104 असा आहे. याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचाही तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केला. तपासादरम्यान रावसाहेब ऊर्फ पप्पू पांडुरंग चव्हाण, रा. सावडी याचे नाव निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची मोटारसायकल सावडी गावातील पुलाजवळ लपवून ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मोटारसायकल जप्त केली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक ईसामिया बहेरी करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कवाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा डी.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली, करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस नाईक मोहोळकर, पोलिस नाईक ईसामिया बहेरी, वैभव ढेंगळ, रविराज गटकुळ, अर्जुन गोसावी, अमोल रंदिल, योगेश येवले आणि गणेश शिंदे यांनी सहभाग घेतला.
करमाळा शहरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. सोन्याच्या दागिन्यांची मोठी चोरी आणि मोटारसायकल चोरी अशा दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी आरोपींना अटक केल्याने करमाळा पोलिसांच्या तपासकौशल्याचे कौतुक होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago