Categories: Uncategorized

करमाळ्यात रंगणार उद्या बैलगाडा शर्यतींचा थरार … कृषीमंत्री मा.ना.दत्तात्रयमामा भरणे व मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन.

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील बैलगाडा शर्यतींच्या शौकीनांसाठी यंदा मोठी पर्वणी आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने गुळसडी लगत माजी आमदार जयवंतराव जगताप फार्म हाऊस येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या २३ ऑगस्ट रोजी दिवसभर या शर्यतीचा थरार रंगणार असून सुमारे ५०० बैलगाडे सहभागी होण्याची शक्यता आहे.
या भव्य बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मामा, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरव राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. गुळसडी येथील मैदानावर या स्पर्धेसाठी ८०० फूट लांबीचा ट्रॅक तयार करण्यात आला असून स्पर्धेचे नियोजन पूर्ण झाले आहे.

विजेत्यांवर लाखोंची बक्षीसांची बरसात !

स्पर्धेसाठी सुमारे ४ लाख रूपयांची आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला १ लाख ५५५ रू. बक्षीस असून द्वित्तीय क्रमांकासाठी ८५ हजार ५५५ रू., तृतीय क्रमांकासाठी ६५ हजार ५५५ रू. चौथ्या क्रमांकासाठी ४५ हजार ५५५ रू. बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय पाचव्या क्रमांकासाठी ३५ हजार ५५५, सहाव्या क्रमांकासाठी २५ हजार ५५५, सातव्या क्रमांकासाठी १५ हजार ५५५ आठव्या क्रमांकासाठी ११ हजार ५५५ आणि नवव्या क्रमांकासाठी १० हजार ५५५ रूपये अशी बक्षीसांची लयलूट होणार आहे.
या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

2 hours ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

17 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

23 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

4 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago