संगीत ही मनाला शांती आणि स्थिरता देणारी कला असून, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्यासाठी तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या २९ वर्षांपासून सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत शिक्षण आणि भारतीय कला-संस्कृतीच्या संवर्धनाचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. सुरताल संगीत विद्यालयाच्या प्रगतीसाठी भविष्यातही सदैव पाठीशी राहणार, अशी ग्वाही सोनियाताई जयकुमार गोरे यांनी दिली आहे.
कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे गुरुजी आणि पं. वि. दिं. पलुसकर गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १२ वा आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत महोत्सव व पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोनियाताई जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. पं. के. एन. बोळंगे गुरुजी आणि पं. वि. दिं. पलुसकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी बोलताना सोनियाताई गोरे म्हणाल्या, गेल्या २९ वर्षांपासून सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी गायन व वादनाचे शिक्षण घेत आहेत. संगीत शिक्षणाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्याचे आणि समाजोपयोगी कार्य करण्याचे काम विद्यालय करीत आहे. संगीतामुळे मनाला शांती व स्थिरता मिळते. त्यामुळे अशा संस्थांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. विद्यालयाला भविष्यात कोणतीही गरज भासल्यास निश्चितपणे सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत आणि ग्लॅमोवेल वेलनेस, पुणे यांच्या संस्थापिका डॉ. प्रचिती पुंडे यांनी मनोगत व्यक्त करून सुरताल संगीत विद्यालयाच्या कार्याचा गौरव केला.
महोत्सवामध्ये सुरताल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह देशाच्या विविध भागांतून आलेल्या कलाकारांनी सहभाग घेतला. गायन, वादन आणि नृत्याच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. भारतीय शास्त्रीय संगीतासह विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणातून भारतीय कला-संस्कृतीचे दर्शन घडले. कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
संगीत, नृत्य आणि भारतीय कला-संस्कृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांचा यावेळी ‘सुरताल पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. डॉ. श्रद्धा जवंजाळ यांना संस्थेचा मानाचा ‘सुरताल संगीत रसिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच डॉ. सुनीता टिकारे, ज्योती दास, देबाश्री मुखर्जी, बिजिता गोस्वामी, तनमना चौधरी, मृदुस्मिता दत्ता, स्निग्धा टाईड आणि भाग्यश्री पेंधे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व पुरस्कारार्थींना मानाची पैठणी साडी भेट देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास श्री. विलासरावजी घुमरे, प्राचार्य मिलिंद फंड, श्री. कन्हैयालाल देवी, श्री. श्रेणिक शेठ खाटेर, जिल्हा परिषद सदस्या अश्विनीताई चिवटे, डॉ. हेमा शिराळ, सौ. सुनीता देवी, श्री. भारतभाऊ शिंदे-पाटील आणि संतोष शेठ शियाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
तसेच बाळासाहेब पिसे, भाजपचे लक्ष्मण केकान, महादेव अण्णा फंड, डॉ. महेंद्र नगरे, नगरसेविका स्वातीताई फंड, डॉ. स्वाती घाडगे, विष्णू शिंदे, कल्याणराव साळुंके, कल्याण फंड, बाळकृष्ण लावंड, अशोक बरडे, अक्रूर शिंदे, सतीश वीर, संतोष पोतदार, दिगंबर पवार, पाटील सर, पत्रकार दिनेश मडके, किरणकुमार नरारे, नवनाथ थोरात, किशोर नरारे आणि ज्योती मुथा यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि महिला संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमला भवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब नरारे यांनी केले. सूत्रसंचालन संध्या थोरे, रेशमा जाधव आणि अर्चना सोनी यांनी केले, तर आभार सौ. साक्षी नरारे यांनी मानले.
२९ वर्षांच्या संगीत साधनेची परंपरा पुढे नेत सुरताल संगीत विद्यालयाने आयोजित केलेल्या या महोत्सवातून करमाळ्याच्या सांस्कृतिक क्षेत्राची समृद्ध परंपरा अधोरेखित झाली. देशभरातील कलाकार, विद्यार्थी आणि रसिकांच्या उपस्थितीमुळे हा संगीत महोत्सव करमाळ्याच्या सांस्कृतिक विश्वातील संस्मरणीय सोहळा ठरला आहे.
करमाळा प्रतिनिधी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी…
करमाळा प्रतिनिधी समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने सन २०२६-२७ या वर्षासाठी २० टक्के…
करमाळा प्रतिनिधी 'संकटाच्या वेळी धावून जाणे आणि अनोळखी व्यक्तीच्या जीवाची पर्वा करणे' हीच खरी लोकसेवा…
करमाळा : प्रतिनिधी रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण असला, तरी या सणाला देशसेवेची…
* . करमाळा प्रतिनिधी आरोग्यसेवा ही समाजसेवेचा महत्त्वाचा भाग असून, सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर तज्ज्ञ वैद्यकीय…
करमाळा प्रतिनिधी पवार जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विशेष आरोग्य शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त…