Categories: Uncategorized

गुळसडी येथे एक बैल एक दुसा मैदानात लखन व चिक्या ठरले पहिल्या पारितोषिकाचे मानकरी

करमाळा प्रतिनिधी
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने गुळसडी लगत माजी आमदार जयवंतराव जगताप फार्म हाऊस येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन काल २३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यामध्ये ३७८ बैलगाडे सहभागी झाले होते.
या भव्य बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते व सुभाष आबा गुळवे जिल्हा परिषद सदस्य ,प्रशांत पाटील जिल्हा परिषद सदस्य, अण्णासाहेब ढाणे, जिल्हा परिषद सदस्य ,योगेश दळवी जिल्हा परिषद सदस्य, एड. अजित विघ्ने उपसभापती पंचायत समिती करमाळा, चंद्रकांत काका सरडे सदस्य पंचायत समिती, भरत अवताडे सदस्य पंचायत समिती यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
विजेत्यांवर लाखोंची बक्षीसांची बरसात !
स्पर्धेसाठी सुमारे ४ लाख रूपयांची आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली होती. पहिल्या क्रमांकाचे मानकरी योगेश भगत बारामती व सागर भाऊ थोरात यांचा हिंदकेसरी लखन आणि कुमार कार्तिक शेठ बदलापूर व राजे फार्म संभाजी राजे भोसले मुरूम यांचा लखन पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्यांना १ लाख ५५५ रू. बक्षीस मिळाले. हेमंत आबा घोलप पाटील व मोहम्मद अली रीस्क ग्रुप कराड यांचा लाडका राहुल्या व सार्थक विजय पाटील यांचा सर्जा हे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्यांना ८५ हजार ५५५ रू. बक्षीस मिळाले, शिवन्या लक्ष्मण ढेरे देवळाली व मानसी योगेश भंडारे यांचा बलमा व मोईन शेख यांचा मन्या भाई हे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्यांना ६५ हजार ५५५ रू चे बक्षीस मिळाले. विजेत्यांना निमगाव के चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे व मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके देण्यात आली. याव्यतिरिक्त ४ क्रमांकासाठी ४५ हजार ५५५ रू., पाचव्या क्रमांकासाठी ३५ हजार ५५५, सहाव्या क्रमांकासाठी २५ हजार ५५५, सातव्या क्रमांकासाठी १५ हजार ५५५ आठव्या क्रमांकासाठी ११ हजार ५५५ आणि नवव्या क्रमांकासाठी १० हजार ५५५ रूपये अशी बक्षीस देण्यात आली. याबरोबरच सेमी फायनल आणि क्वार्टर फायनल विजेत्यांसाठी स्वतंत्र बक्षीसे देण्यात आली.
याप्रसंगी बाबाराजे जगताप ,मानसिंग खंडागळे, सुजित बागल, गणेश सरडे, सोमनाथ रोकडे, नानासाहेब लोकरे, उमेश इंगळे, तानाजी झोळ, रवींद्र वळेकर, गोरख गुळवे ,विनय ननवरे, आशिष गायकवाड ,राजाभाऊ धांडे, विवेक येवले, नानासाहेब निळ,हनुमंत मांढरे, अमर भांगे ,राजकुमार देशमुख, राजेंद्र पवार, तुषार शिंदे, श्रीकांत ढेरे ,सुरज ढेरे ,योगेश भंडारे, शहाजी झिंजाडे, मयूर पाटील, बालाजी पाटील सतीश बागल, अभिषेक आव्हाड, अश्फाक जमादार ,प्रताप शिंदे आदी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

2 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

3 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

3 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

6 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

1 week ago