*
नागपंचमी हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण असून जुन्या पारंपारिक खेळाच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य जपणारा व निसर्गशी जवळीक साधणारा सण आहे . याप्रसंगी विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी विविध पारंपारिक खेळांच्या आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने झिम्मा, फुगड्या, फेर , झोका , काटवटखाना , अभिनय व नृत्य इत्यादी समावेश होता. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहाने बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. तसेच इयत्ता अकरावी मधील कुमारी मोहिनी रंधवे, कुमारी अर्चना अडागळे, कु. श्वेता आडेकर यांनी पारंपरिक नृत्य सादर केले . यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या महाविद्यालयात गेल्या पाच वर्षापासून विद्यार्थिनी साठी बारावी ही महिने झोके उपलब्ध असतात. महाविद्यात असणाऱ्या निर्भया गार्डन मधील या झोक्याचा आनंद मुली रिकाम्या वेळेत निर्भयपणे घेतात .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. सुरेखा जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. मुक्ता काटवटे यांनी केले . तर आभार प्रा. सौ.सुवर्णा कांबळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सौ. सुजाता भोरे,प्रा. सौ.नीता माने , प्रा. सौ.पल्लवी टोणपे, प्रा .सौ. रूपाली शिंदे, प्रा. सौ. स्वाती मोरे, प्रा.सौ.स्वाती नलावडे, प्रा. सौ. त्रिवेणी मोरे, प्रा. सौ. आश्विनी अडसूळ, प्रा. सौ. अनिता अधोरे, सौ. अनिता देशमुख ,प्रा.सरला चव्हाण, सौ. राजश्री शिंदे , सौ. भाग्यश्री खटके व श्रीमती मेघा कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…