“गजानन सोशल ॲड स्पोर्ट्स क्लबची गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळाची वाटचाल ही केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित नसून, सामाजिक एकता, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपणारी आहे. हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असून, हीच मंडळाची खरी ओळख आहे,” असे प्रतिपादन गजानन सोशल क्लबचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक प्रशांत ढाळे यांनी केले.
गजानन सोशल ॲड स्पोर्ट्स क्लबच्या २७व्या गणेशोत्सवानिमित्त आयोजित बैठकीत नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रशांत ढाळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी शशांक ढाळे, उपाध्यक्षपदी सुयश विभुते व शंतनु कुलकर्णी, खजिनदारपदी साईराज घाडगे, सचिवपदी आशिष कांबळे, सहसचिवपदी यश देवी, मिरवणूक प्रमुखपदी संकेत जगताप, कार्याध्यक्ष तथा प्रसिद्धी प्रमुखपदी उत्कर्ष पवार, तर आरास प्रमुखपदी सुजल लुंगारे यांची निवड करण्यात आली.
गजानन सोशल ॲड स्पोर्ट्स क्लबची स्थापना १४ जानेवारी २००० रोजी झाली. स्थापनेपासून मंडळाने करमाळा शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याबरोबरच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. मंडळाला पंचवीस वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाला असून, यंदा २७वा गणेशोत्सव साजरा होत आहे. या काळात मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
मागील काही वर्षांपासून मंडळाच्या वतीने करमाळा शहरात गणेश जयंतीचाही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून उत्सवाला विधायक स्वरूप देण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जात आहे.
गजानन सोशल ॲड स्पोर्ट्स क्लबच्या कार्यात हिंदू-मुस्लिम बांधवांचा असलेला सहभाग ही मंडळाची विशेष ओळख असल्याचे प्रशांत ढाळे यांनी सांगितले. “धर्म वेगळे असले तरी समाज म्हणून आपण एक आहोत. सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करणे आणि सामाजिक उपक्रम राबविणे, हीच गजानन सोशल क्लबची भूमिका आहे. त्यामुळे मंडळ हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक बनले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या गणेशोत्सवातही विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. उत्सव अधिक शिस्तबद्ध, आकर्षक आणि समाजोपयोगी करण्यासाठी नवनिर्वाचित कार्यकारिणी प्रयत्नशील राहणार आहे.
नूतन कार्यकारिणीचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक प्रशांत ढाळे यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले. नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली गजानन सोशल क्लबच्या सामाजिक एकतेची आणि विधायक कार्याची परंपरा अधिक जोमाने पुढे जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…
करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…
करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…
करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…
; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…