Categories: Uncategorized

रक्षाबंधनातून करमाळा होमगार्ड पथकात बंधुत्वाचा धागा महिला होमगार्ड भगिनींकडून पुरुष बांधवांना राखी; पुरुष होमगार्डकडून साडी-चोळीची भावाची भेट

करमाळा प्रतिनिधी
बहिण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण करमाळा होमगार्ड पथकामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कर्तव्य बजावताना एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत संघटनेची शिस्त, एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला होमगार्ड सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
करमाळा होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक अधिकारी सचिन जव्हेरी यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्जंट महिला होमगार्ड जयश्री कांबळे, सेक्शन लिडर सारिका बिडकर, तसेच महिला होमगार्ड प्रभा दीक्षित, किशोरी शेंडगे, सरोजनी परदेशी, शैला बुटे, सुवर्णा गायकवाड आणि मनीषा कांबळे यांनी पथकातील पुरुष होमगार्ड बांधवांच्या मनगटावर प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे प्रतीक असलेली रेशीम धाग्याची राखी बांधली. या प्रसंगी बहिण-भावाच्या नात्यातील जिव्हाळा आणि आपुलकीचे दर्शन घडले.
या कार्यक्रमास तालुका समादेशक अधिकारी सचिन जव्हेरी, पलटन नायक दीपक जव्हेरी, महेश शहाणे, सार्जंट प्रवीण महिंद्रकर, सेक्शन लिडर संदिप परदेशी, सोभनाथ ढेपे, पंकज अंदुरे, सहाय्यक सेक्शन लिडर दीपक घाडगे, सद्दाम तांबोळी यांच्यासह होमगार्ड संभाजी कोळेकर, संतोष कुकडे, जावेद काझी, नारायण वायकुळे, संजय कोळेकर, अशोक कांबळे, गणेश साखरे, राहुल पवार, अतुल महाडिक, तुकाराम सोरटे, शकील पठाण, गणेश शहाणे, ज्ञानेश्वर मचाले, अमोल गणगे, समाधान हानपुडे, विशाल नलवडे, तेजस महारनवर, बिभीषण टकले, नवनाथ मोरे आणि प्रदीप लाळगे आदी उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त सेक्शन लिडर होमगार्ड दादा शिंदे यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमावेळी उपस्थित होमगार्ड सदस्यांना मार्गदर्शन करताना तालुका समादेशक अधिकारी सचिन जव्हेरी यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, होमगार्ड संघटनेतील सदस्यांमध्ये जोश, उत्साह आणि परस्परांतील आपुलकी वाढावी, यासाठी पथकाच्या माध्यमातून वेळोवेळी विविध उपक्रम आयोजित केले जातात. होमगार्ड पथक हे केवळ कर्तव्य बजावणारे पथक नसून एक परिवार आहे. या परिवारातील महिला आणि पुरुष होमगार्ड यांच्यामध्ये बंधुत्वाची भावना आणि आपुलकी अधिक दृढ करण्यासाठी रक्षाबंधनासारखे सण महत्त्वाची भूमिका बजावतात.
महिला होमगार्ड भगिनींनी पुरुष बांधवांच्या मनगटावर राखी बांधल्याने प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचे नाते अधिक घट्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्येक होमगार्डने संघटनेची शिस्त, शिकवण, ध्येय-धोरणे, आदर्श, वरिष्ठांचे आदेश व सूचना यांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच संघटनेतील बंधुत्व आणि एकोपा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन  सचिन जव्हेरी यांनी केले.
रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमाला आणखी भावनिक व संस्मरणीय स्वरूप प्राप्त झाले ते पुरुष होमगार्ड बांधवांनी महिला होमगार्ड भगिनींना दिलेल्या विशेष भेटीमुळे. करमाळा होमगार्ड पथकातील सर्व पुरुष होमगार्डांनी स्वयंस्फूर्तीने महिला होमगार्ड भगिनींना भावाची भेट म्हणून मानाची साडी-चोळी भेट दिली.
अचानक मिळालेल्या या प्रेमाच्या भेटीने महिला होमगार्ड भगिनी भावुक झाल्या. त्यांनी ही भेट आनंदाने स्वीकारत पुरुष होमगार्ड बांधवांचे आभार मानले. कर्तव्याच्या क्षेत्रात एकत्र काम करताना निर्माण झालेले बंधुत्वाचे नाते अशा उपक्रमामुळे अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यानंतर महिला होमगार्ड भगिनींच्या वतीने उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. हसत-खेळत, एकमेकांना शुभेच्छा देत आणि बंधुत्वाचा संदेश देत करमाळा होमगार्ड पथकातील रक्षाबंधन सोहळा उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमातून होमगार्ड पथकातील एकता, शिस्त, परस्पर सन्मान, आपुलकी आणि बंधुभावाचा संदेश समाजासमोर आला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

    करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…

15 hours ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

  करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

22 hours ago

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर चोरीची बीड-चिखलठाण टोळी जेरबंद तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्ह्यांची उकल

करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…

2 days ago

खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची वाताहत! २४ गावांपैकी १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही- भरत (भाऊ )आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…

2 days ago

पुणे शिक्षक मतदार संघ कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार मुकुंद साळुंखे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…

4 days ago

जिल्हा परिषद शाळांत पहिलीपासून सेमी इंग्रजीसाठी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची आढावा बैठक आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणीला गती देण्याचे नियोजन;

; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…

5 days ago