Categories: Uncategorized

नीट परीक्षेत उत्तुंग यश शशांक कांबळेची एम्स राजकोट येथे एमबीबीएससाठी निवड

 

करमाळा प्रतिनिधी

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट यूजी २०२६’ (NEET UG 2026) या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेत करमाळा येथील शशांक प्रमोद कांबळे याने घवघवीत यश संपादन केले आहे. नीटच्या पहिल्या समुपदेशन फेरीत (Round 1) त्याची देशातील प्रतिष्ठित एम्स राजकोट (AIIMS Rajkot) येथे एमबीबीएस (MBBS) पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.शशांकने राष्ट्रीय पातळीवर १६,११६ ऑल इंडिया रँक (AIR) मिळवत हे उल्लेखनीय यश संपादन केले. तो प्रथितयश डॉ. प्रमोद कांबळे आणि डॉ. कविता कांबळे यांचा सुपुत्र आहे. वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) २३ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या पहिल्या फेरीच्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीनुसार (Provisional Allotment) शशांकला एम्स राजकोट येथे एमबीबीएसची जागा निश्चित झाली आहे.विशेष म्हणजे, शशांकची राज्यातील प्रतिष्ठित केईएम (KEM), मुंबई तसेच एएफएमसी (AFMC) येथेही निवड झाली आहे. त्यामुळे त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षक तसेच करमाळा परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अत्यंत प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेत शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याने शशांकच्या शैक्षणिक कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यात एक उत्तम डॉक्टर म्हणून देशसेवा करण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.सुर ताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब नरारे यांनी शशांक कांबळे याचे अभिनंदन करून त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

16 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

19 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

2 days ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

3 days ago