पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास देवळाली येथील अमोल सदाशिव शिंदे यांच्या घराजवळ तसेच त्यांच्या उसाच्या शेतात ही कारवाई करण्यात आली. अमोल शिंदे यांच्या चारचाकी वाहनातून गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर विक्रीसाठी साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली.
तपासणीदरम्यान मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (एमएच १२ केवाय ६६१६) या वाहनाच्या डिक्कीत ‘रॉयल इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्की’च्या १२ पेट्या आढळून आल्या. या बाटल्यांवर ‘फॉर सेल इन गोवा ओन्ली’ असा उल्लेख असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर अमोल शिंदे यांच्यासोबत असलेल्या विकी आंधारे याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरापासून सुमारे १५० मीटर अंतरावरील उसाच्या शेतातही पोलिसांनी शोध घेतला.
शेतातील प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये दारूच्या पेट्यांसह विविध इंग्रजी दारू ब्रँडच्या नावांचे प्लास्टिक बुच आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामध्ये ऑफिसर्स चॉईस ब्ल्यूचे २६० बुच, रॉयल स्टॅग सीग्राम्सचे २९० बुच आणि इम्पॅक्ट ब्ल्यूचे २० संशयित बनावट बुच जप्त करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालामध्ये चारचाकी वाहनाची किंमत ४ लाख रुपये, दारूची किंमत २० हजार १६० रुपये, तर विविध प्रकारच्या बुचांची किंमत ३ हजार ४२० रुपये, अशी एकूण ४ लाख २३ हजार ५८० रुपयांची आहे.
दरम्यान, पोलिस कारवाईदरम्यान अमोल शिंदे, त्यांची पत्नी अनुषया अमोल शिंदे, आई रतन सदाशिव शिंदे व भाऊ धनंजय सदाशिव शिंदे यांनी पोलिसांच्या तपासणीस विरोध केल्याचा तसेच पोलिसांशी हुज्जत घातल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या घटनेप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व धमकी देणे यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७४/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १२३, १३२, १८९(२), १९०, १९१(२), ३५१(२), ३५२ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(ई), ८०, ८१, ८३, १०८ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाळाजी वलसणे करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी (आयपीएस), अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे आणि करमाळा उपविभागाच्या सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक रणजित माने, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे, सहायक पोलिस निरीक्षक बाळाजी वलसणे, पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम ढपाटे, पोलीस हवालदार क्र. १८५४ दीपक घोरपडे, महिला पोलीस हवालदार क्र. १३१ शीतल न्हावकर, पोलीस कॉन्स्टेबल क्र. ९१२ वैभव ठेंगळ, पोलीस कॉन्स्टेबल क्र. १२५९ गणेश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल क्र. १५२४ अमोल रंडील आणि पोलीस कॉन्स्टेबल क्र. ८५६ अर्जुन गोसावी यांनी सहभाग घेतला.
पोलिसांच्या या कारवाईमुळे देवळाली परिसरात अवैध मद्यसाठ्याबाबत चर्चेला उधाण आले असून, जप्त करण्यात आलेल्या दारू व संशयित बुचांचा वापर नेमका कोणत्या पद्धतीने होत होता, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…