Categories: Uncategorized

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी टीडीएफकडून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी मुलाखत व मूल्यमापनानंतर निवड; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण

करमाळा प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) पुरस्कृत उमेदवार म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा टीडीएफ पुणे विभाग समन्वयक कौस्तुभ मुरलीधर गावडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. टीडीएफच्या निवड समितीने निर्धारित निकषांनुसार केलेल्या मूल्यमापनानंतर गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांनी दिली आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑगस्ट रोजी टीडीएफच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेत पाच इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला होता. मुलाखतीदरम्यान संघटनेशी असलेली बांधिलकी, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव तसेच शिक्षकांसाठी केलेले कार्य या विविध निकषांचा विचार करण्यात आला. त्यानंतर कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.
टीडीएफच्या माध्यमातून आतापर्यंत २० ते २२ आमदारांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात यापूर्वी टीडीएफ आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने एकत्रितपणे निवडणूक लढविल्याचेही सांगण्यात आले. या माध्यमातून सलग तीन टर्म टीडीएफचे आमदार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात टीडीएफची संघटनात्मक पार्श्वभूमी मजबूत असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.
कौस्तुभ गावडे यांनी सांगितले की, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात टीडीएफची दीर्घकाळापासून संघटनात्मक बांधणी आहे. यापूर्वी टीडीएफ आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने एकत्रितपणे निवडणूक लढविली असून, शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने काम करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर टीडीएफने आपल्यावर विश्वास व्यक्त करून उमेदवारी दिल्याचे त्यांनी सांगितले.
गावडे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याची प्रतिक्रिया टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग देण्याच्या दृष्टीने ही उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन गायकवाड, सचिव नीलकंठ लिंगे, तसेच हरिदास जाधवर, मिटकरी सर, हसरमणी सर, लक्ष्मण महानवर, हनुमंत जोडबोठे, विजय वाघमोडे, भारत इंगवले, राजाराम शिवशरण, शिवाजी लोखंडे, सचिन झाडबुके, दगडे, बनसोडे सर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

12 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

15 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

1 day ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

3 days ago