Categories: Uncategorized

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी करमाळ्यात ४ संप्टेंबरला रस्ता रोको ‘चलो करमाळा’चे आवाहन; मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा

करमाळा : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे दि. २९ ऑगस्टपासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाज, करमाळा शहर व तालुका यांच्या वतीने शुक्रवारी दि. ४ सप्टेंबर रोजी भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबतचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने करमाळा तहसीलदार व प्रशासनाला देण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची शासनाने दखल घ्यावी आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत समाजबांधवांमध्ये चिंता व्यक्त होत असून, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता देवीचा मळ, बायपास रोड, करमाळा येथे रस्ता रोको आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याबरोबरच अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला करमाळा शहर व तालुक्याचा ठाम पाठिंबा व्यक्त केला जाणार आहे.
आंदोलनाची पूर्वकल्पना प्रशासनाला देण्यात आली असून, त्यासंदर्भातील निवेदन तहसीलदार प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे. प्रशासनाने आंदोलनस्थळी आवश्यक ती व्यवस्था करावी, अशी अपेक्षाही आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
करमाळा शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाज, करमाळा शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

13 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

16 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

1 day ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

3 days ago