केत्तूर पंचायत समिती गणातील मौजे हिंगणी गावाला भविष्यात ‘स्मार्ट आणि ग्रीन व्हिलेज’ बनविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहभागातून विकासकामांना गती देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शुक्रवार (दि. ४) रोजी पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजिनाथ सर्जेराव विघ्ने यांनी हिंगणी गावाचा दौरा करून गावातील विविध विकासकामांची पाहणी केली.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच संतोष बाबर, उपसरपंच मयूर बाबर, युवक नेते तथा माजी सरपंच हनुमंत पाटील, शंकरराव जाधव, विनोद बाबर, अभिजीत बाबर, हिरालाल गायकवाड, नितीन पाटील यांच्यासह ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, आरोग्य सेविका व मदतनीस, आशा सेविका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
ॲड. विघ्ने यांनी ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, मंदिर परिसर, पाणीपुरवठा व्यवस्था, स्मशानभूमी तसेच गावात सुरू असलेल्या नवीन वृक्षारोपणाची पाहणी करून संबंधितांकडून माहिती घेतली. जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना सुरू असून गावातील नागरिकांना पाणीपुरवठा होत असल्याचे यावेळी निदर्शनास आले.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येत असून, या उपक्रमासाठी तब्बल तीन लाख रुपये किमतीची मोठी झाडे लावण्यात येत आहेत. त्यामुळे हिंगणी गावाच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.
यावेळी ग्रामस्थांशी विविध शासकीय योजनांबाबत चर्चा करून भविष्यात विकासकामांमध्ये ग्रामस्थांचा सहभाग अधिक वाढविण्याबाबत विचारमंथन करण्यात आले. गावातील उपलब्ध साधनसुविधांचा योग्य वापर करून विकासकामांचा वेग वाढविणे, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे तसेच गाव अधिक आधुनिक व सुविधायुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन ॲड. विघ्ने यांनी केले.
“हिंगणी गावाची सुरू असलेली विकासाची वाटचाल निश्चितच समाधानकारक असून, गावाला स्मार्ट आणि ग्रीन व्हिलेज बनविण्यासाठी माझा नेहमीच पाठिंबा व पुढाकार राहील,” असे ॲड. अजित विघ्ने यांनी सांगितले.
गावात सुरू असलेले वृक्षारोपण, जलजीवन योजनेद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा आणि ग्रामस्थांच्या सहभागातून होणारी विकासकामे पाहता हिंगणी गाव भविष्यात आदर्श, हरित आणि स्मार्ट गाव म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र पाहणीदरम्यान दिसून आले
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दहीहंडी उत्सवानिमित्त करमाळ्यात ‘सिनेमॅटिक रील्स स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले…
करमाळा प्रतिनिधी: मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक नागरिकांना वाटते; मात्र आधुनिक…
करमाळा प्रतिनिधी : मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक नागरिकांना वाटते; मात्र…
करमाळा प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा बजावत असतानाच आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि फिटनेसचे महत्त्व…
करमाळा प्रतिनिधी कोंढार-चिंचोली, ता. करमाळा : ‘आपलं गाव-आपला विकास’ या उपक्रमांतर्गत अॅड. अजित विघ्ने यांनी…
करमाळा प्रतिनिधी: प्रेम, माया आणि आपुलकीने माणसांना जोडून ठेवणारे कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या…