आबांच्या स्मृतींना उजाळा देताना परिवाराच्या भावना “मायेची गेली सावली, करुणेचा हरवला सागर; उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला” या हृदयस्पर्शी शब्दांतून व्यक्त होत आहेत. त्यांच्या निधनाने परिवारावर निर्माण झालेली पोकळी आजही कायम असून, त्यांच्या सहवासातील प्रेमळ आठवणी प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत.
पुण्यस्मरणानिमित्त सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत युवकवीर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कोठुळे (भिवंडीकर) यांचे हरिकीर्तन होणार आहे. या वेळी मृदुंगाचार्य मृदुंगसम्राट भरत महाराज पठाडे यांची मृदुंगसाथ लाभणार असून गायनाचार्य भाऊ पालवे व सोमनाथ राऊत हे गायनसेवा करणार आहेत.
हरिकीर्तनानंतर दुपारी १२.०५ वाजता कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांचा द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.
आबांच्या जाण्याने निर्माण झालेली उणीव भरून निघणे शक्य नसले, तरी त्यांच्या प्रेमळ आठवणी आणि संस्कार परिवाराला कायम प्रेरणा देत राहतील. पुण्यस्मरणाचा हा दिवस त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या मायेचा आणि आपुलकीचा वारसा जपण्याचा भावनिक क्षण ठरणार आहे.
या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ व आप्तेष्टांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन संतोष बुवासाहेब जाधव-पाटील, डॉ. रोहन प्रदीप जाधव-पाटील, अभिजीत प्रदीप जाधव-पाटील, अजिंक्य संतोष जाधव-पाटील यांच्यासह समस्त जाधव-पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : जाधव-पाटील वस्ती, तरटगाव
दिनांक : शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी १० ते १२ हरिकीर्तन; दुपारी १२.०५ वाजता पुण्यस्मरण कार्यक्रम.
कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यास कार्यक्रमास उपस्थिती प्राथनिय आहे.
करमाळा प्रतिनिधी: मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक नागरिकांना वाटते; मात्र आधुनिक…
करमाळा प्रतिनिधी : मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक नागरिकांना वाटते; मात्र…
करमाळा प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा बजावत असतानाच आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि फिटनेसचे महत्त्व…
करमाळा प्रतिनिधी कोंढार-चिंचोली, ता. करमाळा : ‘आपलं गाव-आपला विकास’ या उपक्रमांतर्गत अॅड. अजित विघ्ने यांनी…
करमाळा प्रतिनिधी केत्तूर पंचायत समिती गणातील मौजे हिंगणी गावाला भविष्यात ‘स्मार्ट आणि ग्रीन व्हिलेज’ बनविण्यासाठी…
करमाळा प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, प्रतिकूल परिस्थितीत नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर, उपक्रमशीलता तसेच…