करमाळ्यातील गायकवाड चौक येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी ४ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत करता येणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास ३ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील रील्स निर्माते, युवक-युवती आणि सोशल मीडिया क्षेत्रात सक्रिय असलेल्या तरुणांमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्पर्धकांनी तयार केलेल्या रील्समध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ असणे आवश्यक आहे. उत्तम संकल्पना असलेल्या रील्सना विशेष महत्त्व देण्यात येणार असून, चांगल्या ‘कन्सेप्ट’च्या रील्सना प्राधान्याने पारितोषिक मिळू शकते. प्रत्येक स्पर्धकाने आपली तयार केलेली रील @ganesh_chivate_bjp या सोशल मीडिया अकाउंटला कोलॅबोरेशन करून तसेच आपल्या पेजवर पोस्ट करणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी व्हिडिओची लांबी किमान एक मिनिट किंवा त्यापेक्षा अधिक असावी. स्पर्धकांनी तयार केलेल्या रीलची लिंक/माहिती दिलेल्या क्रमांकावर पाठवून नोंदणी करणे आवश्यक आहे. व्हिडिओ Full HD 1080p सिनेमॅटिक क्वालिटीमध्ये असावा, अशी अट आयोजकांनी ठेवली आहे. स्पर्धकांचे व्हिडिओ ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार असून, त्यानंतर आलेले व्हिडिओ ग्राह्य धरले जाणार नाहीत.
तसेच १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सर्व स्पर्धकांनी श्री. गणेश (भाऊ) चिवटे यांच्या कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. विजेता स्पर्धक उपस्थित नसल्यास त्याचे पारितोषिक रद्द करून पुढील पात्र स्पर्धकाची निवड केली जाऊ शकते. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सन्मानचिन्ह देण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी जाहीर केले आहे.
या अभिनव उपक्रमामुळे दहीहंडी उत्सवाला केवळ पारंपरिक स्वरूप न राहता डिजिटल युगातील तरुणाईच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे. अभिनय, दिग्दर्शन, एडिटिंग, छायाचित्रण आणि कल्पक व्हिडिओ निर्मितीची आवड असलेल्या युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी संपर्क :
अमोल पवार – ९६८९७ ०७३९२
ऋषिकेश फंड – ९२८४२ ८११३५
सोहम केसकर – ९३७०२२९२५१
करमाळा प्रतिनिधी: मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक नागरिकांना वाटते; मात्र आधुनिक…
करमाळा प्रतिनिधी : मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक नागरिकांना वाटते; मात्र…
करमाळा प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा बजावत असतानाच आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि फिटनेसचे महत्त्व…
करमाळा प्रतिनिधी कोंढार-चिंचोली, ता. करमाळा : ‘आपलं गाव-आपला विकास’ या उपक्रमांतर्गत अॅड. अजित विघ्ने यांनी…
करमाळा प्रतिनिधी: प्रेम, माया आणि आपुलकीने माणसांना जोडून ठेवणारे कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या…
करमाळा प्रतिनिधी केत्तूर पंचायत समिती गणातील मौजे हिंगणी गावाला भविष्यात ‘स्मार्ट आणि ग्रीन व्हिलेज’ बनविण्यासाठी…