Categories: Uncategorized

करमाळा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांसाठी 2 कोटीं 50 लाख निधी मंजूर पाणंद रस्ते योजना समितीचे सहअध्यक्ष दिग्विजय बागल यांची माहिती

 

करमाळा प्रतिनिधी |

बळीराजाला शेतात जाणे सोयीचे व्हावे तसेच शेतीमालाची वाहतूक अधिक जलद व सुलभ व्हावी, यासाठी **‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजने’**अंतर्गत करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी 2.कोटी50 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बळीराजा पाणंद रस्ते योजना समितीचे सहअध्यक्ष दिग्विजय बागल यांनी ही माहिती दिली.ग्रामीण भागात शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगल्या रस्त्यांची मोठी अडचण भासत असते. पावसाळ्यात चिखल आणि खडतर रस्त्यांमुळे शेतीमालाची वाहतूक करणे, तसेच खते, बी-बियाणे व अन्य साहित्य शेतात नेणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कष्टाचे ठरत होते. शेतकरी बांधवांची ही अडचण ओळखून दिग्विजय बागल यांनी करमाळा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.या मागणीची दखल घेत शासनाने 2, कोटी 50लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे पाणंद रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण होऊन बळीराजाच्या दैनंदिन कष्टांची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. शेतीमाल थेट बाजारपेठेपर्यंत वेगाने पोहोचवणे शक्य होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.शेतकऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अडीच कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे दिग्विजय बागल यांनी आभार मानले. निधी मंजूर झाल्यामुळे लवकरच पाणंद रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, दिग्विजय बागल यांच्या या प्रयत्नांबद्दल करमाळा मतदारसंघातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

*चौकट
करमाळा मतदारसंघातील ज्या शेतकरी बांधवांना पाणंद रस्त्याची गरज आहे, त्यांनी तातडीने संपर्क साधावा. आपल्या गावातील व शेतशिवारातील आवश्यक पाणंद रस्त्यांची माहिती द्यावी.लवकरच पाणंद रस्ते योजना समितीची बैठक आयोजित करण्यात येणार असून, याबाबत प्रांत अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी तसेच शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी चांगला रस्ता मिळावा, यासाठी आवश्यक पाणंद रस्त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पाणंद रस्त्याची आवश्यकता आहे, त्यांनी आपल्या गावातील व शेतशिवारातील रस्त्याची माहिती वेळेत द्यावी, जेणेकरून संबंधित कामाचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी घेता येईल.                                              श्री. दिग्विजय बागल
सहअध्यक्ष, बळीराजा पाणंद रस्ता समिती

saptahikpawanputra

Recent Posts

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

14 hours ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

17 hours ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 day ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

2 days ago

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा शिक्षक नेते मुकुंद साळुंखे यांचे आवाहन; सोलापूर जिल्ह्यातून मोठे मताधिक्य मिळण्याचा विश्वास

करमाळा : प्रतिनिधी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करण्यासाठी…

5 days ago