*
दहीहंडी फोडण्याबरोबरच काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
त्यांच्यासोबत करमाळा तालुका काँग्रेस आयचे भटक्या विमुक्त जातीचे तालुकाध्यक्ष श्री देवराव अण्णा सुकळे,शिवसेनेचे युवक नेते संभाजी शिंदे, शहर युवकचे शहराध्यक्ष सुजय जगताप, योगेश राखुंडे यांच्यासह काँग्रेसचे सर्व उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी तसेच पक्षाच्या विविध शाखेचे शाखाध्यक्ष इतर सर्व पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवात केवळ गोविंदा पथकांनीच हंडी फोडली नाही, तर करमाळ्यात मोठी ‘राजकीय हंडी’ देखील फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपचे नूतन सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणल्याने भाजपच्या संघटनात्मक बांधणीला मोठी चालना मिळाल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात या पक्षप्रवेशाचा करमाळा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
प्रतापराव जगताप हे माजी आमदार नामदेवराव जगताप यांचे चिरंजीव असून करमाळा तालुक्यात त्यांचे कार्यकर्त्यांचे व समर्थकांचे चांगले संघटन असल्याचे मानले जाते. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसला असून भाजपला मात्र स्थानिक पातळीवर एक मजबूत राजकीय चेहरा आणि संघटनात्मक बळ मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रतापराव जगताप यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे विचार, विकासाची भूमिका आणि ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, दहीहंडीच्या निमित्ताने झालेला हा राजकीय प्रवेश आगामी काळातील करमाळ्याच्या राजकारणाची दिशा बदलणारा ठरणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्व, गणेश चिवटे यांची संघटनात्मक रणनीती आणि प्रतापराव जगताप यांचे स्थानिक संघटन यांचा मेळ भाजपला करमाळ्यात कितपत बळकटी देतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
एकंदरीत, दहीहंडीच्या उत्सवात फुटलेली ही ‘राजकीय हंडी’ करमाळ्याच्या राजकारणात आगामी काळात कोणते नवे समीकरण घडवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख… करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, करमाळा नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती राहुल भैया जगताप,
भाजपा मंडलाध्यक्ष काकासाहेब सरडे ,महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, नगरसेवक रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले पदाधिकारी व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून करमाळा तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…
करमाळा : प्रतिनिधी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करण्यासाठी…