Categories: Uncategorized

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘ज्ञानज्योती आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रा. डॉ. बबनवाहन पांडुरंग रोंगे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्यात’ त्यांचा गौरव करण्यात आला.
रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी तुळजाई लॉन्स, बार्शी नाका, करमाळा रोड, कुर्डुवाडी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रात प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या समर्पित कार्यशैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची जोपासना होत असून विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुनील जाधव यांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान करमाळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

6 mins ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

6 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

23 hours ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

2 days ago