Categories: Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड अध्यक्षपदी अल्लाउद्दीन शेख उपाध्यक्षपदी जय बिडकर शुभम कोंगे सचिवपदी भैय्या सुर्यवंशी यांची निवड

करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली. मंडळाचे मार्गदर्शक सुनील बापू सावंत, ॲड. राहुल भाऊ सावंत, नगरसेवक संजय अण्णा सावंत तसेच मंडळाचे ज्येष्ठ युवा कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी अल्लाउद्दीन शेख, उपाध्यक्षपदी जय बिडकर व शुभम कोंगे, सचिवपदी भैय्या सूर्यवंशी, तर सहसचिवपदी सागर नलवडे यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी भूषण सुरवसे, सहखजिनदारपदी सागर वीर, मिरवणूक प्रमुखपदी रोहित बनकर, उपमिरवणूक प्रमुखपदी बंटी शिंदे आणि कार्याध्यक्षपदी अवी सुरवसे यांची एकमताने निवड झाली.
गणेशोत्सव काळात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांचे नियोजन करून उत्सव उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा मानस नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मंडळाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संदीप दुधाळ यांनी आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

17 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

17 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

23 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

2 days ago