Categories: Uncategorized

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत झरे यांच्या वतीने यंदाही गणेशोत्सवानिमित्त एक फूट उंचीच्या ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप करण्यात आले. गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष आहे. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाला झरे गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गणेशोत्सवानिमित्त सकाळी गणरायाची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी गावातील अनेक ग्रामस्थ, महिला, युवक तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरतीनंतर भाविकांना एक फूट उंचीच्या गणेशमूर्तींचे मोफत वाटप करण्यात आले. गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
सुनील बळवंत झरे हे गेल्या सहा वर्षांपासून आई-वडिलांच्या स्मृती जपत गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तींचे मोफत वाटप करीत आहेत. धार्मिक परंपरेसोबतच समाजातील प्रत्येक कुटुंबाला गणेशोत्सव साजरा करता यावा, गणरायाच्या भक्तीचा आनंद सर्वांना घेता यावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षी या उपक्रमाला मिळणारा ग्रामस्थांचा प्रतिसाद पाहता उपक्रमाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित होत आहे.
यंदा कुटुंबातील नातेवाईकाचे दुःखद निधन झाल्याने घरात शोकाकुल वातावरण होते. त्यामुळे यावर्षी कोणत्याही पत्रकार बांधवांना स्वतःहून निमंत्रण देता आले नाही. तसेच कार्यक्रमही साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आला. या परिस्थितीमुळे पत्रकार बांधवांना निमंत्रण देता आले नसल्याबद्दल सुनील झरे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
यावेळी गणेशमूर्तींची संख्या अधिक असल्याने कार्यक्रमाचे छायाचित्रे व व्हिडिओ तसेच बातमीची माहिती पाठविण्यास काहीसा उशीर झाला. मात्र, सकाळच्या आरतीपासून गणेशमूर्ती वाटपापर्यंत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. गावातील सर्व स्तरांतील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू केलेला हा उपक्रम केवळ गणेशमूर्ती वाटपापुरता मर्यादित न राहता सामाजिक एकोपा आणि धार्मिक संस्कार जपण्याचा संदेश देणारा ठरत आहे. कोणताही गाजावाजा न करता गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम सुरू ठेवण्यात आला असून, भविष्यातही ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवण्याचा मानस सुनील बळवंत झरे यांनी व्यक्त केला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘प्रत्येक घरात गणराय’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत असून, झरे ग्रामस्थांकडून सुनील बळवंत यांच्या या सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे कौतुक होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

2 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

2 hours ago

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

2 days ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

2 days ago