Categories: Uncategorized

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*

 करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय सरडे याने जामखेड तालुक्यामध्ये आज झालेल्या कुस्तीमध्ये आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडली आहे. १७ वर्षे वयोगटातील ५५ किलो वजन गटात राम धनंजय सरडे याची तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

रामने कुस्तीच्या मैदानावर दाखवलेली जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट खेळकौशल्य यामुळे त्याने ही निवड सार्थ ठरवली. अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी प्रगती करावी, यासाठी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीने सातत्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच एक सुंदर परिणाम म्हणून रामने मिळवलेले हे यश संस्थेसाठी अभिमानाची बाब ठरले आहे.

रामच्या या यशामुळे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक व क्रीडाप्रेमींकडून त्याचे कौतुक होत आहे.

कुस्तीच्या पुढील स्पर्धेतही रामने उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या तालुक्याचे तसेच ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

5 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

7 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

8 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

8 hours ago

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

2 days ago