Categories: Uncategorized

करमाळ्यात हृदयविकार उपचारांना नवी दिशा जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅथलॅबचे लोकार्पण सोमवार २१ सप्टेंबरला भव्य उद्घाटन सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

करमाळा : प्रतिनिधी
करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅथलॅब सुविधेचा शुभारंभ सोमवार (ता. २१) सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. हृदयविकाराशी संबंधित अत्याधुनिक तपासणी व उपचार सुविधा करमाळ्यात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या सुविधेच्या उद्घाटनासाठी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भगवानराव गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जाधव-पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या काही काळापासून करमाळा व परिसरातील नागरिकांना विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामीण व निमशहरी भागातील रुग्णांना गंभीर आजारांच्या उपचारासाठी सोलापूर, पुणे अथवा इतर मोठ्या शहरांमध्ये जावे लागू नये, या दृष्टीने स्थानिक पातळीवर आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅथलॅबची सुविधा सुरू करण्यात येत आहे.
या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयमामा शिंदे राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार नारायण (आबा) पाटील, माजी आमदार जयवंतराव (भाऊ) जगताप, माजी आमदार राहुल (भैय्या) मोटे भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश (भाऊ) चिवटे, गटनेत्या रश्मी (दिदी) बागल-कोलते, करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनी (ताई) सावंत, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, केटीएमपीचे अध्यक्ष डॉ. नानासाहेब लोकरे तसेच केएमसीचे अध्यक्ष डॉ. संतोष आटोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वेळेवर निदान आणि उपचाराला विशेष महत्त्व असते. अशा परिस्थितीत करमाळ्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरातील रुग्णांना उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सेवा अधिक जवळ मिळण्यास मदत होऊ शकते. कॅथलॅबच्या माध्यमातून हृदयाशी संबंधित आवश्यक तपासण्या व वैद्यकीय प्रक्रियांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध आहे. यामध्ये डॉ. रोहन प्रदीपकुमार पाटील, डॉ. स्वप्नील माळी, डॉ. शिवानी पाटी, डॉ. रोहन हेगडे संतोषकुमार जाधव-पाटील, अभिजीत जाधव-पाटील आणि अजिंक्य जाधव-पाटील यांचा समावेश आहे. हृदयविकार, मेडिसिन, पॅथॉलॉजी आदी क्षेत्रातील वैद्यकीय सेवांबरोबरच हॉस्पिटलमध्ये जिजाऊ पॅथॉलॉजीकल लॅब आणि इतर सुविधा कार्यरत आहेत.
करमाळा व परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत अधिक सक्षम सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने जाधव-पाटील हॉस्पिटलच्या सुविधांमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. अत्याधुनिक कॅथलॅबच्या माध्यमातून हृदयविकाराच्या उपचार क्षेत्रात स्थानिक पातळीवर आणखी एक सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचे लक्ष या उद्घाटन सोहळ्याकडे लागले आहे.
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य उद्घाटन समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जाधव-पाटील हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, जाधव-पाटील हॉस्पिटल, मेन रोड, करमाळा, जि. सोलापूर येथे हा सोहळा होणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

4 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago