Categories: Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता प्रत्यक्षात उतरणार आहे. करमाळा नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा येत्या सोमवार,दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता छत्रपती चौक, भवानी नाका, करमाळा येथे अत्यंत उत्साहात होणार असल्याची माहिती करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई संजय सावंत व उपनगराध्यक्ष अतुल हरिभाऊ फंड यांनी दिली आहे.
अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा करमाळ्यात उभारला जावा, अशी तीव्र इच्छा सर्व शिवप्रेमींची होती. अखेर हा ऐतिहासिक क्षण समीप आल्याने संपूर्ण करमाळा शहर व तालुक्यात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली सदरचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा मोहिनीताई संजय सावंत यांनी दिलेली आहे.
या प्रसंगी करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन धोंडीराम तपसे व सर्व नगरसेवक तसेच विविध समित्यांचे सभापती, नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
करमाळ्याच्या वैभवात भर घालणाऱ्या या ऐतिहासिक व गौरवशाली सोहळ्यास करमाळा शहर तसेच तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, नागरिक, महिला व अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवस्मारक प्रतिष्ठान, शिवजयंती उत्सव समिती व करमाळा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

2 days ago