Categories: Uncategorized

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

 

करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान पदाधिकारी कपिल मंडलिक यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे करमाळा शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटनाला आणखी बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष श्री. गणेश भाऊ चिवटे व करमाळा शहराध्यक्ष श्री. जगदीश अग्रवाल यांच्या हस्ते कपिल मंडलिक यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कपिल मंडलिक हे गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून पक्ष संघटनेत सक्रियपणे कार्यरत आहेत. विविध सामाजिक, संघटनात्मक व पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग नोंदवत कार्यकर्त्यांशी मजबूत संपर्क निर्माण केला आहे. पक्षाच्या विविध अभियानांच्या यशस्वी अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष श्री. गणेश चिवटे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांच्या कष्टाचे व समर्पणाचे मूल्यमापन करणारी संघटना आहे. कपिल मंडलिक यांनी पक्षासाठी केलेले सातत्यपूर्ण काम, संघटन वाढीसाठी घेतलेले परिश्रम आणि कार्यकर्त्यांशी ठेवलेला जिव्हाळ्याचा संबंध लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून शहरातील पक्ष संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहराध्यक्ष श्री. जगदीश अग्रवाल यांनीही कपिल मंडलिक यांना शुभेच्छा देत पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रसार, नव्या कार्यकर्त्यांची जोडणी आणि आगामी पक्ष अभियानांमध्ये प्रभावी काम करण्याचे आवाहन केले.
निवडीनंतर कपिल मंडलिक यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडणार असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टीचे विचार, केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच करमाळा शहरात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी भाजपा मंडल अध्यक्ष काकासाहेब सरडे, भाजपा नेते प्रतापराव जगताप, नितीन चोपडे, महेश दिवाण, अभिजीत मंडलिक, बाबा करंडे, सोनू करंडे, गणेश आलाट, ओंकार आलाट यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

23 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

1 day ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago