कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या रुग्णसेवेचा वारसा पुढे नेत करमाळ्यात जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅथलॅब सेवा सुरू करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना हृदयरोगाच्या उपचारासाठी आधुनिक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणारा पाटील कुटुंबीयांचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भगवानराव गोरे यांनी केले.
कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांनी आपल्या वैद्यकीय सेवाकाळात सर्पदंश झालेल्या अनेक रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. तसेच गोरगरीब व गरजू नागरिकांना सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा देत त्यांनी करमाळ्यात रुग्णसेवेची विश्वासार्ह परंपरा निर्माण केली. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून त्यांनी केलेले कार्य आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्यांचा हाच सेवाभावी वारसा डॉ. रोहन जाधव-पाटील, डॉ. शिवानी पाटील, संतोषकुमार पाटील, अभिजित पाटील व अजिंक्य पाटील यांच्यासह जाधव-पाटील कुटुंबीय पुढे नेत आहेत.
करमाळ्यात अत्याधुनिक कॅथलॅब सुरू झाल्यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांना अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसारख्या उपचारांसाठी सोलापूर, पुणे किंवा इतर मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे. विशेषतः गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. रोहन जाधव-पाटील यांनी सांगितले की, कॅथलॅबच्या अधिकृत उद्घाटनापूर्वीच या सुविधेच्या माध्यमातून ६६ अँजिओग्राफी आणि ६४ अँजिओप्लास्टी करण्यात आल्या आहेत. रुग्णांना वेळेत आणि आधुनिक उपचार मिळावेत, हा कॅथलॅब सुरू करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये हृदयरोग उपचारासोबतच मेडिसिन, पॅथॉलॉजी, जिजाऊ पॅथॉलॉजिकल लॅबसह विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. डॉ. रोहन जाधव-पाटील, डॉ. स्वप्नील माळी, डॉ. शिवानी पाटील, डॉ. रोहन हेगडे तसेच संतोषकुमार जाधव-पाटील, अभिजित जाधव-पाटील व अजिंक्य पाटील यांच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरू आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अविनाश घोलप होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे सर, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश (भाऊ) चिवटे, गटनेत्या रश्मी (दिदी) बागल-कोलते, करमाळा नगरपरिषदेच्या अध्यक्षा मोहिनी (ताई) सावंत, सभापती पूजा (ताई) ढेरे, उपसभापती ॲड. अजित विघ्ने, दिग्विजय भैय्या बागल, शिवसेना वैद्यकीय सेलचे प्रमुख मंगेश चिवटे, सुनील सावंत, विक्रमसिंह शिंदे, यशवंत भैय्या शिंदे, शंभूराजे जगताप, सविताराजे भोसले, योगेश दळवे सर, भरत भाऊ आवताडे, सुजित तात्या बागल, अतुल पाटील, प्रकाश पाटील, धुळाभाऊ कोकरे, राजेंद्रसिंह राजेभोसले, अशपाक जमादार, जयप्रकाश बिले सर, जगदीश अग्रवाल, विवेक येवले, उदयसिंह देशमुख, आशिष गायकवाड, राजाबापू पाटील, नितीन जगदाळे, दादासाहेब जाधव, रवींद्र वळेकर, नितीन खटके आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच डॉ. केवारे, डॉ. संतोष आटोळे, डॉ. नागनाथ लोकरे, डॉ. रोहन हेगडे, डॉक्टर रविकिरण पवार डॉ. स्वप्नील माळी यांच्यासह करमाळा तालुका प्रॅक्टिशनर असोसिएशन व करमाळा मेडिकोज गिल्डचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच राजकीय, सामाजिक, वैद्यकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती होती.
या ऐतिहासिक सोहळ्याला करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या सेवाभावी कार्याला आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची जोड देत जाधव-पाटील कुटुंबीयांनी करमाळ्याच्या आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या परिसरात अत्याधुनिक हृदयरोग उपचार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रोहन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रणजीत शिंदे यांनी केले, तर आभार डॉ. शिवानी पाटील यांनी मानले.
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरात साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवस्मारकाच्या कामासाठी निधीची…
* करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचा राजा राशीनपेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील विविध विकासकामांना गती देण्यासाठी तब्बल १० कोटी…
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…