Categories: Uncategorized

सरपडोहच्या देवस्थान इनाम जमिनींच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेच्या उपस्थितीत ३० सप्टेंबरला मंत्रालयात बैठक – दिग्विजय बागल

करमाळा( प्रतिनिधी )- मौजे सरपडोह तालुका करमाळा येथील देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भात विचार विनिमय करण्याकरिता मंत्रालयीन पातळीवर राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या दालनामध्ये दिनांक 30 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण व स्वतंत्र बैठक आयोजित केली असल्याची माहिती भाजपा जिल्हा युवा नेते व मकाई कारखान्याचे माजी चेअरमन माननीय श्री दिग्विजय बागल यांनी आज येथे दिली याबाबत अधिक माहिती देताना श्री बागल म्हणाले की मौजे सरपडोह या गावांमध्ये गेल्या 12 ते 14 वर्षापासून जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार बंद असून वारस नोंदी घरकुलांचे व इतर शासकीय लाभ वाडी वस्तीवर हातपंप घेणे शिवाय पीक कर्ज घेणे याबाबतही अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासोबत अनेक शासकीय सुविधा देता येणे शक्य होत नाही देवस्थान इनाम जमीन अशी नोंद असल्यामुळे नागरिकांचे व जनतेचे प्रचंड हाल होत आहेत याबाबत सरपडोह येथील ग्रामस्थांनी विविध स्तरांवर निवेदने व मागण्या केल्या परंतु अद्याप त्याला यश आले नव्हते परंतु राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे भाजपा जिल्हा परिषदेच्या गटनेत्या व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष माननीय रश्मीदिदी बागल यांनी एक स्वतंत्र पत्र दिले त्यानुसार राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी मंत्रालयीन दालनात महत्त्वपूर्ण व स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे मौजे सरपडोह तालुका करमाळा येथील येथील जमिनींवरील निर्बंध हटवणे बाबत अनेक वेळा वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने कोणती कार्यवाही केलेली नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे व नागरिकांचे हाल होत आहेत याबाबत दिनांक 30 सप्टेंबर च्या बैठकीत निश्चितपणे ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा यावेळी माननीय भाजपा युवा नेते श्री दिग्विजय बागल यांनी व्यक्त केली या बैठकीसाठी मौजे सरपडोह तालुका करमाळा येथील एक शिष्टमंडळ मुंबईला घेऊन जाणार असल्याची माहिती ही शेवटी श्री दिग्विजय बागल यांनी दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर! पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आवर्तन एक महिना अगोदर सुरू करण्याची मागणी

  करमाळा प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा…

3 days ago

करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे सचिन (मालक) गायकवाड यांच्या हस्ते दिमाखात उद्घघाटन

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…

5 days ago

ऊसदर आणि अतिवृष्टी अनुदानासाठी १३ नोव्हेंबर रोजी करमाळ्यात शेतकऱ्यांची बैठक; आंदोलनाची दिशा ठरणार – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६…

7 days ago

दुष्काळात मुक्या जीवांसाठी कै बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानचा माणुसकीचा झरा सात वर्षांपासून वन्यजीवांसाठी चारा-पाण्याची अखंड सेवा

करमाळा प्रतिनिधी दुष्काळाच्या झळा केवळ माणसांनाच सोसाव्या लागत नाहीत, तर जंगलातील मुके वन्यजीवही पाण्याच्या थेंबासाठी…

7 days ago