राशीन पेठ येथील स्वर्गीय शिवा (नाना) कांबळे यांच्या स्मरणार्थ गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेशभक्तांसाठी अल्पोपहार व पाणी वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा शहरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात विविध गणेश मंडळांचा उत्साह पाहायला मिळत असताना, राशीन पेठ येथे कांबळे परिवार आणि राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने गणेशभक्तांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. एक हजारहून अधिक गणेशभक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेत अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.
स्वर्गीय शिवा (नाना) कांबळे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम यंदा सलग चौथ्या वर्षी घेण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेशभक्तांना सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या उपक्रमाला दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमासाठी स्वर्गीय शिवा (नाना) कांबळे यांचे चिरंजीव सुरज कांबळे, कांबळे परिवार तसेच राशीन पेठ तरुण सेवा मंडळातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले. मिरवणुकीतील गणेशभक्तांना अल्पोपहार व पाणी वाटप करत युवकांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच समाजोपयोगी उपक्रमातून माणुसकीची सेवा करण्याचा हा प्रयत्न असल्याने परिसरातील नागरिकांकडून कांबळे परिवार व राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणारा हा उपक्रम गणेश विसर्जन मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरला आहे
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा शहर व परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा,…
* करमाळा(प्रतिनिधी)- तालुक्यातील सहकाराचे,सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचे मंदिर असलेला आदिनाथ कारखाना,ही शासकीय दरानुसार सुमारे ५०० कोटी…
करमाळा प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणुकीने…
करमाळा : प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहपूर्ण आणि भक्तिमय…
करमाळा : प्रतिनिधी – सीना-कोळगाव जलाशयातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या उद्देशाने काही गावांतील शेतीपंपांचा वीजपुरवठा…
करमाळा( प्रतिनिधी )- मौजे सरपडोह तालुका करमाळा येथील देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भात विचार विनिमय करण्याकरिता…