Categories: Uncategorized

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

 

करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक २९/०/२०२६ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता भिलारवाडी येथील कारखाना कार्यस्थळावर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.

तत्पूर्वी कारखान्याचे संस्थापक, लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल (मामा) यांचे कारखाना कार्यस्थळावर असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे पुजन शेटफळ गांवचे प्रगतीशिल बागायतदार श्री. लालासाहेब पोळ यांचे शुभहस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. तदनंतर सभेच्या कामकाजास सुरूवात होवून सुरूवातीला कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक श्री. एच. पी. खाटमोडे यांनी श्रध्दांजली ठरावाचे वाचन केले त्यानंतर कारखान्याचे चेअरमन श्री दिनेश अंबादास भांडवलकर यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन करून सर्व विषयास मंजुरी देणेबाबत सभेस उपस्थित असलेल्या सनमाननीय सभासदांना विनंती केल्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासद यांनी एकमुखाने मंजुरी दिली. विषयपत्रीकेवरील सर्व विषयांना मंजुरी मिळाल्यानंतर कारखान्याचे संचालक श्री. कल्याण सरडे यांनी कारखान्याचे मा. चेअरमन श्री दिग्विजय दिगंबरराव बागल यांची मुख्यमंत्री पाणंद रस्ते सहअध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेणेबाबत विनंती केली तसेच मौजे सावडी ता. करमाळा येथील सभासद श्री संतोष तळेकर यांनी तालुक्यातील दुष्काळी परीस्थीतीचा विचार करून कारखान्याचे वतीने एक चारा छावणी सुरू करावी अशी विनंती केली.

आपल्या प्रास्ताविकामध्ये कारखान्याच्या मार्गदर्शिका मा. रश्मी (दिदी) बागल यांनी राज्यातील सर्वच साखर कारखाने मागील चार पाच वर्षापासून फार मोठ्या संकटातून जात असून येत्या पुढील काळात मकाई कारखाना हा नावारूपास आलेला सहकारी तत्वावरील कारखाना असेल असे सांगीतले. सध्या महाराष्ट्रावर फार मोठ्या दुष्काळाचे सावट असुन शासनाच्या आदेशानुसार कारखान्याचे वतीने जनावरासाठी छावणी सूरू करण्याच्या तसेच या वर्षात कामावर असणाय्या सर्व कामगारांना येत्या दिपावली सणासाठी ८.३३ टक्के बोनस आदा करण्याच्या सुचना संचालक मंडळास दिल्या. तालुक्यातील उजनी पाणी वाटप नियोजन कमिटीमध्ये उजनी परिसरातील व्यक्तींचा समावेश करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन यांनी तालुक्याच्या मा. आमदार श्रीमती शामलताई दिगंबरराव बागल, कारखान्याचे मा. चेअरमन मा. दिग्विजय दिगंबरराव बागल व आपल्या मार्गदर्शिका मा. रश्मी (दिदी) दिगंबरराव बागल यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या पुढील काळात कारखाना खुप प्रगती करेल अशी ग्वाही देवून मा. रश्मी (दिदी) दिगंबरराव बागल यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे या वर्षात कामावर असणाऱ्या सर्व कामगारांना येत्या दिपावली सणासाठी ८.३३ टक्के बोनस आदा केला जाईल असे सांगीतले. शेवटी आभार संचालक श्री. कल्याण सरडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी श्री. चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

सोगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी माजी आमदार शिंदे गटाच्या सरडे यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी सोगांव ग्रामपंचायत च्या उप- सरपंच पदी करमाळा विधानसभा मा.आमदार श्री संजय (मामा) शिंदे…

2 days ago

आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांची सुवर्णभरारी 57 विद्यार्थ्यांपैकी 48 विद्यार्थ्यांनी मिळवले मानाचे यश; गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

करमाळा  प्रतिनिधी: करमाळा शहरातील मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन…

3 days ago

खोलेश्वर महादेवाला पावसासाठी साकडे नगराध्यक्ष मोहिनी सावंत व नगरसेवक संजय सावंत दाम्पत्याच्या हस्ते पूजा-अभिषेक तीन दिवसांचा धार्मिक उपक्रम

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा शहर व परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा,…

3 days ago

आदिनाथचा लिलाव ही तालुक्यासाठी अतिशय दुर्दैवी घटना : संचालक डॉ.अमोल घाडगे

* करमाळा(प्रतिनिधी)- तालुक्यातील सहकाराचे,सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचे मंदिर असलेला आदिनाथ कारखाना,ही शासकीय दरानुसार सुमारे ५०० कोटी…

4 days ago

सरकार मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी* *स्वरांजली ऑर्केस्ट्रा’च्या सादरीकरणाने मिरवणुकीत रंगत; विविध उपक्रमांनी गणेशोत्सवाची सांगता

करमाळा प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणुकीने…

4 days ago

सरकार मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी ढोल-ताशांचा गजर भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप

करमाळा : प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहपूर्ण आणि भक्तिमय…

4 days ago