Categories: Uncategorized

ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणासाठी डाक विभागाने जनतेपर्यंत पोहोचावे – मुन्ना कुमार यशकल्याणी सेवाभवनात डाक महामेळावा; ५० मुलींच्या ‘सुकन्या समृद्धी’ खात्यांना यशकल्याणीचा पुढाकार…

*

करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. भारत सरकारच्या आर्थिक समावेशनाच्या उद्दिष्टपूर्तीत डाक कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन पंढरपूर विभागाचे डाक अधीक्षक श्री. मुन्ना कुमार यांनी केले.यशकल्याणी सेवाभवन येथे भारतीय डाक विभागाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष डॉ.गणेश करे-पाटील उपस्थित होते.
डॉ.करे-पाटील म्हणाले, “भारतीय डाक विभागाने काळानुरूप आपले स्वरूप बदलत सर्वसामान्यांच्या विश्वासाचे केंद्र म्हणून स्थान टिकवले आहे. ग्रामीण भागातील छोट्या बचतीला आर्थिक सुरक्षिततेत रूपांतरित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डाक विभाग करत आहे. सुकन्या समृद्धी, टपाल जीवन विमा आणि विविध बचत योजनांचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा.”
यावेळी यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ५० मुलींची सुकन्या समृद्धी खाती उघडून त्यांच्या सुरक्षित भविष्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. ‘माय स्टॅम्प’च्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्याच्या उपक्रमाचेही डॉ. करे-पाटील यांनी कौतुक केले.
कार्यक्रमास डाक निरीक्षक लक्ष्मण शेवाळे, सब पोस्टमास्तर उदय बंडगर, जीवन शिक्षण फाउंडेशनचे जयेश पवार तसेच करमाळा, जेऊर व केतूर येथील डाक कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रमेश शेलार यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

11 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

13 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

19 hours ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago

सोगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी माजी आमदार शिंदे गटाच्या सरडे यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी सोगांव ग्रामपंचायत च्या उप- सरपंच पदी करमाळा विधानसभा मा.आमदार श्री संजय (मामा) शिंदे…

4 days ago

आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांची सुवर्णभरारी 57 विद्यार्थ्यांपैकी 48 विद्यार्थ्यांनी मिळवले मानाचे यश; गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

करमाळा  प्रतिनिधी: करमाळा शहरातील मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन…

4 days ago