Categories: Uncategorized

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

 

करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत मंत्रालयीन पातळीवर समाधानकारक तोडगा काढावा, अशी मागणी भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे भ्रमणध्वनी द्वारे केली आहे.याबाबत बोलताना रश्मी बागल म्हणाल्या की, करमाळा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सहा तलावांसह मांगी तलाव परिसरातील शेतकऱ्यांच्या खासगी विहिरी व बोअरचा वीजपुरवठा महावितरणकडून सरसकट बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याचा धोका निर्माण झाला असून मोठे नुकसान होण्याची भीती आहे.या प्रश्नासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू असून, शेतकऱ्यांच्या मागणीवर समाधानकारक तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर वडगाव, दक्षिण वडगाव, जातेगाव, पुनवर, मांगी, हिवरवाडी यांसह मांगी तलावावरील लाभार्थी शेतकऱ्यांना वीजपुरवठा बंदचा निर्णय नुकसानकारक ठरणार असल्याचे बागल यांनी सांगितले.दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असले तरी सध्या उभी असलेली पिके वाचविणेही आवश्यक आहे. शेतकऱ्यांची व्यथा मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. या प्रश्नावर लवकरच समाधानकारक तोडगा निघण्याची अपेक्षा आहे, असे रश्मी बागल यांनी सांगितले.

रश्मी बागल, भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षा

> “मांगी तलाव परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद झाल्याने उभी पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांची ही व्यथा मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा सुरू असून लवकरच या प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.”

saptahikpawanputra

Recent Posts

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर! पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आवर्तन एक महिना अगोदर सुरू करण्याची मागणी

  करमाळा प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा…

3 days ago

करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे सचिन (मालक) गायकवाड यांच्या हस्ते दिमाखात उद्घघाटन

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…

5 days ago

ऊसदर आणि अतिवृष्टी अनुदानासाठी १३ नोव्हेंबर रोजी करमाळ्यात शेतकऱ्यांची बैठक; आंदोलनाची दिशा ठरणार – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६…

7 days ago

दुष्काळात मुक्या जीवांसाठी कै बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानचा माणुसकीचा झरा सात वर्षांपासून वन्यजीवांसाठी चारा-पाण्याची अखंड सेवा

करमाळा प्रतिनिधी दुष्काळाच्या झळा केवळ माणसांनाच सोसाव्या लागत नाहीत, तर जंगलातील मुके वन्यजीवही पाण्याच्या थेंबासाठी…

7 days ago