भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव जगताप यांची कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सदिच्छा भेट दिली . बाजार समिती आवारात आल्यानंतर प्रथमतः त्यांनी देशभक्त कै . नामदेवराव जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले .या प्रसंगी बोलताना ते म्हणाले , मोठ्या बंधू सारखे असलेले आदरणीय जयवंत भाऊ यांनी माझ्या राजकीय कारकिर्दी मध्ये नेहमीच आशिर्वाद दिले आहेत . खरंतर दुष्काळा मूळे सत्कार न घेता आदिनाथ महाराज , आई कमलाभवानी यांच्या प्रसादरूपी आशिर्वादाचा श्रीफळ मी जयवंत भाऊ च्या हस्ते स्विकारतो ,गेल्या ३० वर्षा पासून आमचा दोस्ताना असून एकमेकां बद्दल जिव्हाळा आहे . कै .नामदेवराव जगताप ,भाऊसाहेब झाडबुके व श्रीमती प्रभाताई झाडबुके यांच्या काळातील राजकारणाचा व त्यांनी जिल्हयाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा ही त्यांनी आवर्जून उल्लेख केला .सामाजिक विषयावर नेहमीच जयवंत भाऊंनी मला मार्गदर्शन केले आहे . विधानपरिषद निवडणुक झाल्या नंतर पहिल्यांदा च करमाळ्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये राजाभाऊ राऊत यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते . यावेळी पूढे बोलताना ते म्हणाले अतिशय संघर्षातून ग्रामपंचायती पासून सुरु झालेला राजकीय प्रवास निःपक्षपातीपणे सर्व सामान्यांच्या केलेल्या कामे करत आज विधानपरिषदेपर्यंत पोहोचला आहे . मागच्या विधानसभा निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या व जिल्ह्यातील जयवंत भाऊ सारख्या सहकाऱ्यांमूळे मला जिल्ह्यातील ११ तालुक्याचे प्रतिनिधीत्व करून सेवा करण्याची संधी मिळाली आहे . पुढील काळात आपल्या तालुक्या मध्ये शेलगाव येथील केळी निर्यात केंद्र, उपसा सिंचन योजना यासह बाजार समितीच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू तसेच आदिनाथ कारखाना चालला पाहिजे त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करू असेही ते म्हणाले . डीसीसी बँकेच्या निवडणूकीबाबत बोलताना ते म्हणाले की प्रशासकाच्या काळात बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे . माझ्या तालुक्यात १३५ पैकी १३० ठराव माझ्या बाजूने आहेत . जयवंतराव जगताप यांचे मार्गदर्शनाखाली डीसीसी बँकेची निवडणूक लढवून आपण कामकाज करू असे ते म्हणाले . मी डीसीसी बँकेचा चेअरमन होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले . करमाळा तालुक्यातील कोणतेही काम मला सांगा आपण ते पूर्णत्वास नेऊ असे आश्वासनही त्यांनी दिले . यावेळी मा . आ . जयवंतराव जगताप यांनीही मनोगत व्यक्त करून विधानसभा तसेच जिल्हा बँकेत काम करत असतानाचे काही किस्से सांगत दोघांच्या दोस्तान्याला उजाळा देऊन . राजाभाऊंना मोठमोठ्या जबाबदाऱ्या पेलण्या साठी ईश्वर सामर्थ्य देवो अशा शुभेच्छा दिल्या .या वेळी . जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हा बँकेचे माजी संचालक अरुण कापसे,बार्शीचे माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक भारत पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील,करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष अमोद संचेती, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, बाजार समितीचे उपसभापती बबन मेहेर, संचालक तात्यासाहेब शिंदे, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी ,दादासाहेब जाधव, जनार्दन नलवडे,मनोज पितळे, परेश दोशी, शहाजी शिंगटे,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विक्रांत मंडलेचा नगरसेवक सचिन अब्दुले, रोहिदास आल्हाट,युवराज चिवटे ,सुजित बागल यांचे सह बाजार समिती व खरेदी विक्री संघाचे आजी माजी संचालक,नगरसेवक, गटसचिव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा . दत्तात्रय भागडे यांनी केले .
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…