Categories: Uncategorized

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिर संस्थानचे विश्वस्त श्री. शिरीषकुमार लोणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी करमाळ्याच्या तहसीलदार मा. शिल्पा ठोकडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. घटस्थापनेनंतर सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या गजरात देवीची आरती संपन्न झाली.नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक विधींची जय्यत तयारी करण्यात आली होती. माही डेकोरेशन व मराठा मंदिर डेकोरेशन यांच्या वतीने मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून, या सजावटीमुळे मंदिर परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. मंदिर संस्थानचे पुजारी श्री. दादासाहेब पुजारी यांनी देवीची विधिवत पूजा मांडली. पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि आई राजा उदो उदो, सदा आनंदीचा उदो उदो!’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.या मंगलमय धार्मिक सोहळ्याप्रसंगी मंदिर संस्थानचे विश्वस्त, तहसीलदार मा. शिल्पा ठोकडे मॅडम, पुरोहित रविराज पुराणिक, सुशील पुराणिक, मंदिराचे पुजारी श्री. बापूराव पुजारी, विजय पुजारी, संदीप पुजारी(सर), जयदीप पुजारी, भारत सोरटे ,नारायण सोरटे,अभिमान सोरटे, रामलिंग सोरटे यांच्यासह मंदिरातील सर्व मानकरी व सेवेकरी उपस्थित होते.शारदीय नवरात्रोत्सव हा आदिशक्तीच्या उपासनेचा, श्रद्धेचा आणि मांगल्याचा उत्सव मानला जातो. या नऊ दिवसांत श्री कमला भवानी देवीच्या दर्शनासाठी करमाळा शहरासह परिसरातील विविध गावांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

3 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

4 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

7 days ago