Categories: Uncategorized

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

 

करमाळा प्रतिनिधी,
करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून इच्छुक शाळांनी पंचायत समिती करमाळा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन भाजप नेते दिग्विजय बागल यांनी केले आहे.

यावेळी अधिक माहिती देताना बागल म्हणाले की, सध्याचे युग हे अत्यंत स्पर्धात्मक बनले असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीदेखील शिक्षणाच्या स्पर्धेत मागे राहू नयेत यासाठी शिक्षण पद्धतीत काळानुसार बदल करणे आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरापासूनच इंग्रजी भाषेची ओळख व आत्मविश्वास मिळावा, तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीत त्यांना अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्याअनुषंगाने करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांपैकी जास्तीत जास्त शाळां मध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे बागल यांनी सांगितले
शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आवश्यक प्रस्ताव व कागदपत्रे पंचायत समिती करमाळा शिक्षण विभागाकडे सादर करावीत, असे बागल यांनी नमूद केले.

जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम सुरू झाल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. भविष्यातील स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधींसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना महागड्या खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची गरज न पडता जिल्हा परिषद शाळांमध्येच दर्जेदार शिक्षण मिळावे, यावर आमचा भर आहे.”यासंदर्भात पंचायत समिती सभापती दालनात सोमवार दिनांक 12 रोजी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे

— दिग्विजय बागल, भाजप नेते, करमाळा

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

3 hours ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

3 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

4 days ago